Kriti Sanon : ठुमकेश्वरीचे काय हे नखरे❤️; क्रिती ब्लॅक नेटमध्ये अवतरली

Kriti Sanon
Kriti Sanon

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ( Kriti Sanon ) तिच्या आगामी 'भेडिया' चित्रपट लवकरच चाहत्याच्या भेटीस येत आहे. नुकतेच क्रितीने या चित्रपटाचे क्रितीने शुटिग पूर्ण  केले असून , सध्‍या ती चित्रपटाच्‍या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात क्रितीची अभिनेता वरुण धवनसोबत केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. याच दरम्यान क्रितीच्या ब्लॅक रंगाच्या साडीतील फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

आगामी 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निर्मात्यासह क्रिती आणि वरूनने कोणताही कसर सोडली नाही. चित्रपटाचे शुटिंग संपल्याने सर्व कलाकार त्याच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. याच दरम्यान क्रितीचा वरूनसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत क्रितीने ( Kriti Sanon ) ब्लॅक रंगाची नेट साडी परिधान करून चारचॉद लावले आहेत. यातील खास म्हणजे, क्रितीच्या ब्लॉऊजसोबत तिच्या ग्लॅमरस लूकवर चाहत्याची नजर पडलीय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Still feels like Diwali .. ✨??' असे लिहिलं आहे.

याच दरम्यान क्रितीचा चित्रपटातील ठुमकेश्वरी हे हिंदी गाणे रिलीज करण्यात आलं आहे. यानंतर चाहत्यांनी तिला 'तर ठुमकेश्वरीचे नखरे पाहाच' असे म्हटलं आहे. मोकळ्या केसांची स्टाईल, गळ्यात नेकलेस, इअररिग्स, रेड लिपस्टिक आणि मेकअपने तिच्या सौदर्यात भर घातलीय. या फोटोवर 'Amazing?', 'Wow ❤️❤️', 'Gorgeous ?', 'Beauty queen??❤️', 'Fire????', 'Hawtttttt and stylish??', 'So gorgeous??', 'Ahh my beauty in blackkk??❤️', 'Hot ???', 'Cutie❤️❤️', 'Wow Soooooooo Beautiful❣❣'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्ट बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास साडेतीन लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. क्रितीच्या आगामी 'भेडीया' या चित्रपचासाठी चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news