दिनेश कार्तिक गुडन्यूज देत म्हणाला; कुटुंब तिनाचे 'पाच' झाले - पुढारी

दिनेश कार्तिक गुडन्यूज देत म्हणाला; कुटुंब तिनाचे 'पाच' झाले

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आणि दिपिका पल्लीकल यांनी गुडन्यूज दिली. दिनेश कार्तिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपले कुटुंब आता तिनाचे पाच झाले असल्याची माहिती दिली. यावेळी त्याने स्वतःसोबत पत्नी आणि आपल्या श्वानाचा फोटो शेअर केला. याचबरोबर या फोटोत दिनेश कार्तिकच्या आणि दिपिका पल्लीकल या दोघांच्या हातात एक एक नवजात बाळ आहे.

दिनेश कार्तिक बाप झाला असून त्याला दोन जुळी मुले झाली आहेत. याची माहिती त्याने ट्विट करुन दिली. त्याने ट्विट केले की, ‘आणि अशा तर्हेने आम्ही तिनाचे पाच झालो आहेत. दिपिका आणि मला दोन सुंदर जुळी मुले झाली आहे. एकाचे नाव कबीर पलीक्कल कार्तिक आणि दुसऱ्याचे नाव झियान पलीक्कल कार्तिक. पूर्वी इतका आनंद कधीच झाला नव्हता.’

भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या क्रिकेट जगतात दुहेरी भुमिका बजावत आहे. तो कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएल खेळत आहे. याचबरोबर तो आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये समोलचनही करतो आहे. त्याचे समालोचन कायम चर्चेचा विषय असतो. दिनेश कार्तिक बरोबरच त्याची पत्नी दिपिका पल्लीकल देखील भारताची अव्वल दर्जाची स्वॉशपटू आहे.

हेही वाचा : 

Back to top button