Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने उघड केले तिच्या प्रिय ‘RP’चं नाव; अभिनेत्रीने फोटो केले शेअर

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने उघड केले तिच्या प्रिय ‘RP’चं नाव; अभिनेत्रीने फोटो केले शेअर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या पोस्टला घेऊन चर्चेत असते. विशेषत: ती ज्या पोस्ट करते त्या गूढच असतात. तिच्या प्रत्येक पोस्टला तिचे चाहते क्रिकेटर ऋषभ पंत याच्याशी जोडतात आणि ती गुढ पोस्ट ऋषभ पंतसाठीच केलेली आहे असा अर्थ काढला जातो. तिच्या पोस्टमुळे असे समजलं जाते की, ऋषभ आणि उर्वशीमध्ये काहीतरी सीन सुरु आहे. अर्थात उर्वशीच्या लव्ह लाइफमध्ये स्वारस्य असलेल्या प्रत्येकाला तिच्या आयुष्यातील आरपी कोण आहे हे जाणून घ्यायचे आहे. दरम्यान, अभिनेत्रीने एक नवीन पोस्ट शेअर करून चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. या अभिनेत्रीने एक फोटो शेअर करून तिच्या आयुष्यातील मिस्टर 'RP'बद्दल सांगितले आहे. (Urvashi Rautela)

वास्तविक, पूर्वी उर्वशी तिच्या मिस्टर 'आरपी'बद्दल बोलताना दिसली होती, ज्याबद्दल चाहत्यांनी असा अंदाज लावला होता, की हा 'आरपी' दुसरा कोणी नसून ऋषभ पंत आहे. तसेच, टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघ रवाना झाला त्याच वेळी उर्वशी सुद्धा ऑस्ट्रेलियाला गेली होती. तिने तेथील फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर सतत तर्कवितर्कांना खतपाणी घालत जात होते. (Urvashi Rautela)

पण, आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाने अखेर खुलासा केला आहे की तिचा 'आरपी' कोण आहे आणि तो पंत नाही. गुरुवारी, माजी मिस युनिव्हर्सने इंस्टाग्रामवर दक्षिणात्य अभिनेता राम पोथिनेनीसोबत एक फोटो पोस्ट केला आणि खुलासा केला की तिच्या आयुष्यातील मिस्टर 'आरपी' ऋषभ पंत नसून राम पोथीनेनी आहे. राम पोथीनेनीसोबतचे फोटो शेअर करताना तिने #love #UrvashiRautela #UR1 #Rampothineni असे हॅशटॅग वापरले आहे. (Urvashi Rautela)

उर्वशी रौतेलाने पोस्ट केलेल्या छायाचित्रांवर अनेक युजर्सनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले – 'बघत आहात ऋषभ भाई.' दुसऱ्या एकाने लिहिले आहे 'तर हा आहे आरपी.' तर तिसऱ्याने थेट विचारले आहे 'हा तुमचा कोण आहे?' (Urvashi Rautela)

पण, काहीही असले तरी उर्वशीच्या या पोस्टने नेटकरी थोडेसे नाराज झाले आहेत. कारण, त्यांच्यासाठी उर्वशी जे आजपर्यंत पोस्ट करत होती ते ऋषभ पंतसाठी होते. यामुळे त्याचा थोडासा अपेक्षा भंग झाल्याचे दिसत आहे. तर अशी माहिती समोर येत आहे की, बायोपती श्रीनु हे दिग्दर्शित करत असलेल्या राम पोथीनेनी याच्या चित्रपटासाठी उर्वशी रौतेला हिची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वशीचे हे 'आरपी' प्रेम कायमचं आहे की, ते तातपुरते आहे हे काही कालावधीनंतर स्पष्ट होईलच.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news