Drugs Case : आर्यन प्रकरणात अनेक त्रुटी, 3 हजार पानांचा अहवाल उघड | पुढारी

Drugs Case : आर्यन प्रकरणात अनेक त्रुटी, 3 हजार पानांचा अहवाल उघड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अनेक त्रुटी आढळल्या आहेत. एनसीबीच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. (Drugs Case) एनसीबी दक्षताच्या विशेष चौकशी पथकाने तीन महिन्यांपूर्वी एनसीबीला अहवाल सादर केला. या प्रकरणाचा तपास करणार्‍या सात अधिकार्‍यांबद्दल त्यांच्या तपासात अनियमितता आढळून आली आहे. आर्यन खान प्रकरणात अधिकाऱ्यांचे संशयित वर्तन आणि आक्षेपार्ह वागणूक दिल्याचे दक्षताच्या विशेष चौकशी पथकाला आढळून आले आहे. (Drugs Case) NCB ची दक्षता समितीचा रिपोर्ट हा इशारा करते की, ड्रग्ज प्रकरणात ब्‍युरोच्या ७ ते ८ अध‍िकारिऱ्यांचे वर्तन आक्षेपार्ह होते. यामध्ये एका वरीष्ठ अध‍िकारीदेखील सहभागी असल्याचे म्हटले जात आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात दोषी आढळला. एनसीबीच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षता तपास पथकाला या प्रकरणात अनेक अनियमितता आढळून आल्या. आर्यन खान प्रकरणाचा तपास करणाऱ्या सात अधिकाऱ्यांवर अनियमितता आढळून आली आहे. एनसीबी दक्षता विशेष चौकशी पथकाने आपला अहवाल दिल्ली मुख्यालयाला पाठवला आहे. या सात अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. अहवालात ६५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

दक्षता पथकाने तीन महिन्यांपूर्वी एनसीबीला अहवाल सादर केला. हा तपास अहवाल तीन हजार पानांचा आहे. त्यात एकूण ६५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले. सर्व जबाबाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. आर्यन प्रकरणात ‘सिलेक्टिव्ह ट्रीटमेंट’ दिल्याचे दक्षता पथकाला आढळून आले. आर्यनने आपल्या वक्तव्यादरम्यान अतिशय औपचारिकता व्यक्त केली होती. गेल्या दीड वर्षात या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी काम केलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात आली. यातील काही प्रकरणांच्या तपासात अनियमितता आढळून आली. या अहवालात एनसीबी अधिकाऱ्यांसाठी मीडिया पॉलिसी बनवण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

सेल्फीसंदर्भातील प्रश्नही दक्षता टीमने आर्यनला विचारले होते. किरण गोस्वामी आणि आर्यन खान यांच्या सेल्फीमुळे हे संपूर्ण प्रकरण समोर आले. त्या सेल्फीशी संबंधित प्रश्नही दक्षता टीमने आर्यन खानला विचारले. खंडणीच्या उद्देशाने सेल्फीचा वापर करण्यात आला. २५ लाखांच्या खंडणीचा पहिला हप्ता आणि समीर वानखेडे यांच्यात थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा तपास पथकाला सापडला नाही. या प्रकरणाशी संबंधित एनसीबीच्या सात अधिकार्‍यांवरील खंडणीच्या आरोपांचीही सखोल चौकशी करण्यात आली.

Back to top button