

पुढारी ऑनलाइन डेस्क : Jobs & Carrier : टेक महिंद्रा कंपनी गुजरातमध्ये पुढील 5 वर्षांत 3000 नोकर भरती करणार आहे. मंगळवारी कंपनीने हे जाहीर केले. टेक महिंद्रा देशातील पाचव्या क्रमांकाची आयटी सेवा निर्यातदार कंपनी आहेत. त्यांनी मंगळवारी त्यांच्या IT/ITeS (IT सक्षम सेवा) धोरणांतर्गत गुजरात सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
Jobs & Carrier : या करारामुळे कंपनीला एंटरप्रायझेसच्या बदलत्या अभियांत्रिकी गरजा पूर्ण करता येतील, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी सी पी गुरनानी यांनी सांगितले. तसेच व्यवसाय करण्याच्या सुलभतेत सुधारणा केल्याबद्दल राज्याचे कौतुक केले.
एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की सरकारने आतापर्यंत IT/ITeS धोरणांतर्गत देशांतर्गत आणि जागतिक कंपन्यांसोबत 15 सामंजस्य करार केले आहेत. ज्यामुळे राज्यात अंदाजे 26,750 कुशल IT रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
हे ही वाचा :