Jyothika B’day : साऊथ स्टार सूर्याची लव्ह स्टोरी; ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे पत्नी | पुढारी

Jyothika B'day : साऊथ स्टार सूर्याची लव्ह स्टोरी; ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे पत्नी

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेत्री ज्योतिका (Jyothika B’day) दक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती आज ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म १८ ऑक्टोबर, १९७७ रोजी मुंबईत झाला होता. तिने कन्नड, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. आपल्या चित्रपटांसोबत ती वैयक्तिक लाईफमुळेही चर्चेत होती. तुम्हाला माहितीये का, चित्रपटात काम करत असताना तिने आपल्या को-स्टारशी प्रेम झालं. पुढे दोघांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या. (Jyothika B’day)

दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये ज्योतिकाचे नाव आहे. अभिनेत्री ज्योतिकाने आपल्या करिअरची सुरुवात बॉलीवूडमधून केली. पण तिला फारशी ओळख मिळाली नाही. त्यानंतर ती दक्षिणेकडे वळली आणि येथे काम करत असताना तिला आपल्या सहकलाकाराशी प्रेम झाले.

अभिनेता सुर्यासोबत काम करताना ज्योतिकाला प्रेम झाले. या दोघांनी १९९९ मध्ये ‘पूवेलम केट्टुपर’ या चित्रपटात पहिल्यांदा काम केले होते. यानंतर त्यांच्या अफेअरचे वृत्त येऊ लागले. अखेर दोघांनी २००६ मध्ये लग्न केले.

ज्योतिका आणि सुर्याने एकूण ७ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दाम्पत्याला मुलगी दिया आणि मुलगा देव अशी दोन मुले आहेत. अभिनेत्री ज्योतिकाने १९९८ मध्ये सिनेविश्वात पदार्पण केले. ‘डोली साज के रखना’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी ‘मुगवारी’, ‘कुशी’, ‘रिदम’, ‘तेनाली’ या तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.

साऊथ चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, तिने आपल्या करिअरची सुरुवात ‘वाली’ चित्रपटातून केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने २० वर्षांच्या करिअरमध्ये ४२ चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे.

आता ज्योतिका चित्रपटांपासून दूर आहे आणि आपल्या कुटुंबासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे. ती आपला सर्व वेळ मुलांची आणि कुटुंबाची काळजी घेण्यात घालवते. तिचा पती सुर्या प्रसिध्द अभिनेता आहे. त्याला ‘सिंघम’ चित्रपटासाठी ओळखले जाते. त्याला ‘सिंघम’ स्टार देखील म्हणतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jyotika (@jyotika)

 

View this post on Instagram

 

A post shared by Jyotika (@jyotika)

 

View this post on Instagram

 

A post shared by Jyotika (@jyotika)

 

View this post on Instagram

 

A post shared by Suriya Sivakumar (@actorsuriya)

Back to top button