बेळगाव : सोशल मीडियाचा घातपातासाठी वापर; पीएफआयकडून जप्त साहित्यातील माहिती

बेळगाव : सोशल मीडियाचा घातपातासाठी वापर; पीएफआयकडून जप्त साहित्यातील माहिती
Published on
Updated on

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (पीएफआय) पदाधिकार्‍यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलद्वारे सोशल मीडियावर भडकावू भाषणांचे व्हिडीओ व घातपाती कारवायांना प्रोत्साहन देण्यात येत होते, अशी माहिती उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वी पीएफआयच्या कार्यालयांवर देशभर छापे घालण्यात आले होते. कर्नाटकातही कारवाई करून 15 जणांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी जप्त करण्यात आलेल्या साहित्याची तपासणी करण्यात आली. फॉरेन्सिक प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीतून अनेक भडकावू भाषणांचे व्हिडीओ आणि घातपात घडवण्यासाठी युवकांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याची माहिती मिळाली.

वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात येत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांच्या भाषणांचे व्हिडीओही संग्रहित करण्यात आले हेाते. त्यांनी इतर धर्माविरुद्ध केलेल्या टीकेबाबत युवापिढीला भडकवण्यात येत होते. गायींची वाहतूक करणार्‍या युवकांना विनाकारण अडवून त्यांना त्रास दिला जातो. त्यांच्यावर हल्ला केला जात असल्याचे सोशल मीडियावर पसरवण्यात आले होते. 2016 पासून आतापर्यंत हिंदुत्ववादी नेत्यांचे व्हिडीओ आणि तेव्हापासून आतापर्यंत पीएफआय कार्यकर्त्यांनी केलेल्या हिंदुत्ववादी नेत्यांच्या हत्यांची माहितीही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत होती. त्यांना सहकार्य करणार्‍या पोलिसांचाही विरोध करण्याचे आवाहन केले जात होते. शिवाय, भारतीय लष्करालाही विरोध करण्याचे सांगण्यात येत होते.

मडिकेरीत पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा कट?

बंगळूर : पुढारी वृत्तसेवाकोडगू जिल्ह्यातील मडिकेरी शहरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला करण्याबाबत चर्चा झाल्याचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियासह त्या संघटनेशी संलग्न असणार्‍या संघटनांवर बंदी घातल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.गेल्या 25 एप्रिल रोजी मडिकेरीचे निजदचे नगरसेवक मुस्तफा यांनी त्यांचे मित्र अद्बुल्ला (रा. बेटगेरी) यांच्यासोबत पेट्रोल बॉम्बहल्ल्याविषयी चर्चा केली.

हिंदूंची लोकसंख्या अधिक असणार्‍या ठिकाणी बॉम्ब हल्ला करावा. आपले काही लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडले तरी चालतील, असे त्यांनी म्हटले होते. याबाबतचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. सदर चर्चा मल्याळी भाषेत झाली आहे. 50 पेक्षा अधिक भागांना लक्ष्य बनवून पेट्रोल बॉम्बहल्ला करण्याबाबत चर्चा झाल्याचे दिसून आले आहे. मडिकेरी येथील एका व्यक्तीने मुस्तफा यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी कॉल कट करण्याऐवजी उचलला आणि खिशामध्ये तसाच ठेवला. त्यांनी आपल्या मित्राशी पेट्रोल बॉम्बबाबत चर्चा केली. या सर्व चर्चेचे त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग झाले. काही दिवसांपूर्वी कॉल रेकॉर्डिंग तपासताना ही माहिती उघडकीस आल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news