बिग बॉस मराठी-4 day 10 : माझ्या मनात कोणाबद्दल राग नाहीये - किरण माने | पुढारी

बिग बॉस मराठी-4 day 10 : माझ्या मनात कोणाबद्दल राग नाहीये - किरण माने

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांचे गट बनणे हे अगदीच साहजिक आहे. पण, किती टिकतील हे मात्र वेळच ठरवते. असाच एक गट आता घरामध्ये बनेल का, अशी शंका आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येऊ शकते. किरण माने, अमृता धोंगडे, अमृता देशमुख, तेजस्विनी, योगेश, विकास आणि निखिल यांच्यामध्ये आज चर्चा रंगणार आहे. (बिग बॉस मराठी-4 day 10) ज्यामध्ये अमृता धोंगडे म्हणाली, “as a टीम म्हणून माझं म्हणणं आहे आपण टीम खेळलो, तो आपल्या टीमचा माणूस होता त्याला विचारलं तो नाही आला संपला विषय.. किरण माने यांचं म्हणणं आहे, “त्याला कळलं आपण उघडे पडणार म्हणून तो पळतो आहे”. (बिग बॉस मराठी-4 day 10)

काल पहिली फेरी झाल्या झाल्या मी याला (विकासला ) म्हणालो, याचा गेम सुरु झाला, याला ग्रुप मध्ये घेणं म्हणजे… बावळटपणा काही अर्थच नाही तो कोणाचं ऐकूनच घेत नाही. निखिल राजेशिर्के म्हणाला, आता अजून एक विचारायचं आहे, यापुढे कुठले टीम टास्क आले तर आपण एकत्र टीम म्हणून खेळायचं का? सगळयांची सहमती आली. किरण यांचं म्हणणं आहे तेजस्विनीला, “तू मला झिरो ठरवून देखील मी तुला सेफ केलं नॉमिनेशनमध्ये, माझ्या मनात राग नाही” आणि “अमृता मी माझी कॅप्टन्सी तुला “वाचवण्यात घालवली, तो निर्णय वेगळा होता, त्यावेळेस मी तुम्हाला सिग्नल देत होतो पण तुम्ही ऐकत नव्हता”… आता बघूया पुढे अजून काय चर्चा झाली.

Back to top button