बिग बॉस मराठी -4 Day 7 : किचन स्टोरी -किरण माने शिकवणार ऑम्लेट करायला | पुढारी

बिग बॉस मराठी -4 Day 7 : किचन स्टोरी -किरण माने शिकवणार ऑम्लेट करायला

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळं जरा बदलेलं दिसत आहे. आज किरण माने यांना प्रसाद जवादे ऑम्लेट बनवायला शिकवणार आहे. (बिग बॉस मराठी -4 ) बिग बोस मराठीच्या घरात फक्त भांडणं, वाद – विवाद इतकंच होत नसून चांगल्या गोष्टी देखील होतात, हे विसरून चालणार नाही. घरात सदस्य एकेमकांना साभांळून देखील घेतात. (बिग बॉस मराठी -4 )

लग्नाविषयी चर्चा

अमृता आणि तेजस्विनीमध्ये लग्नाविषयी चर्चा सुरू आहे. तेजस्विनीच्या भावाने २१ व्या वर्षी लग्न केलं. त्यावर अमृताने विचारले तू का नाही केलंस ? तेजस्विनी अमृताला म्हणाली, असं कोणी भेटलं नाही, आणि आपल्याला ज्याच्यासोबत करायचं आहे त्याला नसतं करायचं आपल्यासोबत. अमृताने एक विचार मांडला, तुला या इंडस्ट्रीमध्ये करायचे आहे की नाही ? त्यावर तेजस्विनी म्हणाली, “इंडस्ट्रीमध्ये कोण आहे ? कोणी आहे का हॅन्ड्सम, कोणीच नाही … मला तरी नाही आवडत इंडस्ट्रीमधलं…”

Back to top button