apurva nemalkar
मनोरंजन
बिग बॉस मराठी ४ दिवस ७ : माझं नावं कानफाट्या ठेवा आता – अपूर्वा
पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भांडणासोबतच आज जरा मज्जा मस्ती देखील बघायला मिळणार आहे. आज डायनिंग टेबलवर भांडण नाही तर सदस्य हसताना दिसणार आहेत. कोण आहे कानफाट्या? अपूर्वा का म्हणते आहे माझं नावं कानफाट्या ठेवा आता… झालं असं रोहितने समृद्धीला विचारले तुझा आज बुबू बघितला नाही. त्यावर समृद्धीचे म्हणणे पडले, त्याला बरं नाही वाटतं आहे झोपला आहे त्याला अपूर्वाची नजर लागली आहे, सारखी चिमटे काढत असते त्याला. त्यावर अपूर्वा म्हणाली, "झालं त्याला पण माझीच नजर लागली. कानफाट्या नावं ठेवलं आहे माझं. तिथल्या नेमप्लेटवरील माझं नावं बदलून कानफाट्या ठेवा. काही झालं तरी घुमून फिरून माझ्यावरचं येते आहे".

