Bipasha Basu Pregnancy : प्रेंग्नेट बिपाशा बसू झाली ट्रोल; हाय हिल्स नको… (video) | पुढारी

Bipasha Basu Pregnancy : प्रेंग्नेट बिपाशा बसू झाली ट्रोल; हाय हिल्स नको... (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री बिपाशा बसू तिच्या प्रेग्नंन्सीमुळे ( Bipasha Basu Pregnancy ) नेहमीच चर्चेत असते. बिपाशाचे प्रेग्नन्सींदरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओज शेअर करत असते. चाहते तिचे भरभरून कौतुक करताना दिसतात; परंतु सध्या तिच्या एका चुकीमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे.

अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोवर लग्नानंतर ६ वर्षानंतर पहिल्यांदा पालक बनणार आहेत. सध्या बिपाशा तिच्या प्रेग्नंन्सीचा ( Bipasha Basu Pregnancy ) काळ एन्जॉय करताना दिसते. याच दरम्यान बिपाशा एका कार्यक्रमानिमित्ताने मुंबईतील बांद्रा परिसरात नुकतीच स्पॉट झाली. यावेळचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावेळी बिपाशाने लाल रंगाचा स्टाईल मॅक्सी ड्रेस परिधान केल्याचे दिसताेय; परंतु, यावेळी तिने घातलेल्या हाय हिल्समुळे ती चांगलीच ट्रोल झाली आहे.

संबंधित बातम्या

बिपाशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच काही चाहत्यांनी तिच्या लूकचे भरभरून कौतुक केलं,  काही नेटकऱ्यांनी तिने घातलेले हाय हिल्समुळे नाराज झाले आहेत. यात एका चाहत्याने तिला प्रेंग्नसीच्या काळात हाय हिल्स घालणं चुकीचं आहे. असं वागणं तुमच्या आरोग्यासाठी धोका असल्याचा सल्ला दिला आहे. दुसऱ्याने ‘ प्रेग्नेंसीच्या काळात आमच्या आणि त्याच्याकडच्या डॉक्टरांपेक्षा शिक्षण वेगळे आहे का? आम्हाला अगदी सुरुवातीपासून हाय हील्स घालण्यास बंदी आहे, उंच हिल्स वापरू नका, प्रेग्नेंसीच्या काळात आरोग्यासाठी चांगले नसते’, ‘असे करू नका, यात तुम्हाला धोका आहे’. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत.

हेही वाचलंत का? 

(video: viralbhayani instragram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

Back to top button