Ambadas Danve : ‘बस नाम ही काफी है; उद्धव बाळासाहेब ठाकरे’ – अंबादास दानवे   | पुढारी

Ambadas Danve : 'बस नाम ही काफी है; उद्धव बाळासाहेब ठाकरे' - अंबादास दानवे  

पुढारी ऑनलाईन डेस्क :   ‘बस नाम ही काफी है… उद्धव बाळासाहेब ठाकरे’ प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेबांना विचारलं, ‘बाळ, व्याख्यानं, भाषणं असं सगळं तुझं सुरू आहे. हे सारं असंच चालू ठेवणार, की त्यास काही संघटित स्वरूप देणार? हा विद्रोह संघटित व्हायला हवा आणि त्यातून जन्म झाला लोकांच्या संघटनेचा. जन्म झाला शिवसेनेचा! असं लिहित विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी इन्स्टाग्रामवर काही पोस्ट केल्या आहेत.

गेले काही दिवस महाराष्ट्राचे राजकारण नाट्यमयरित्या सुरु आहे. काल (दि.8) निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठविण्यात आल्याचा निर्णय दिला. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना या चिन्हाचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर ‘शिवसेना’ हे नाव देखील वापरता येणार नाही असा निर्णय दिला आहे. यानंतर विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर काही पोस्ट केल्या आहेत. त्यांच्या या पोस्ट चर्चेत आहेत. पाहुया काय म्हणाले अंबादास दानवे.

जन्म झाला लोकांच्या संघटनेचा.. जन्म झाला शिवसेनेचा! 

बस नाम ही काफी है।
उद्धव बाळासाहेब ठाकरे
प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेबांना विचारलं : ‘बाळ, व्याख्यानं, भाषणं असं सगळं तुझं सुरू आहे. हे सारं असंच चालू ठेवणार, की त्यास काही संघटित स्वरूप देणार? हा विद्रोह संघटित व्हायला हवा आणि त्यातून जन्म झाला लोकांच्या संघटनेचा. जन्म झाला शिवसेनेचा! मराठी माणसाच्या वेदनेतून निर्माण झालेल्या संवेदनांचा सत्याविष्कार म्हणजे शिवसेना. निष्ठावंत शिवसैनिकांची संघटना म्हणजे शिवसेना. आणि या संघटनेचे चिन्ह आणि नाव गोठवले जाणे हे दु: ख खूप मोठे आहे. एकनाथ शिंदे तुम्हाला सामान्य शिवसैनिक कधीच माफ करू शकणार नाही. या इन्स्टाग्राम पोस्टनंतर त्यांनी गद्दार असा हॅशटॅग दिला आहे.
Ambadas Danve
Ambadas Danve

 

Ambadas Danve : ‘ठाकरे’ नावाचा पुण्यसंचय आणि सत्कर्म

अंबादास दानवे यांनी आणखी एक इन्स्टाग्राम  पोस्ट करत लिहले आहे, आता कदाचित न पक्षाचे नाव असेल न चिन्ह! सोबत आहे फक्त ‘ठाकरे’ नावाचा पुण्यसंचय आणि सत्कर्म.. कायदेशीर लढाया सुरूच राहतील. मात्र, आमच्या पूर्वाश्रमीच्या मित्राने कितीही आपटली तरी ‘ठाकरे’ नावाचे वलय काढून घेण्यास त्यांना अजून अनेक जन्म घ्यावे लागतील.

Ambadas Danve : पुढील काळ हा संघर्षाचा!

 
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना पक्षाने एक सर्वसामान्य शिवसैनिकावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेची जबाबदारी दिली, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा मी मनापासून ऋणी आहे. त्यांनी व पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा घेऊन सरकारला धारेवर धरण्याची जबाबदारी मी पूर्ण ताकदीने पार पाडेन. तसेच स्वतःच्या स्वार्थासाठी गद्दारी करत बनलेल्या या भ्रष्ट सरकारच्या विरोधात संघर्ष करु. पुढील काळ हा संघर्षाचा! असं लिहित त्यांनी तिसरी इन्स्टाग्राम  पोस्ट केली आहे.
Ambadas Danve
Ambadas Danve

आमचे चिन्ह गोठले असेल.. रक्त नाही!

आमचे चिन्ह गोठले असेल.. रक्त नाही! असं ट्विट करत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे आणि शिंदे गट आपल्या पक्षाचं काय नावं देणार आणि कोणती चिन्ह घेणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
हेही वाचलंत का?

Back to top button