Goodbye collection : रश्मिका मंदानाची चालणार का जादू? ‘गुडबाय’ कासवगतीने | पुढारी

Goodbye collection : रश्मिका मंदानाची चालणार का जादू? 'गुडबाय' कासवगतीने

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांचा चित्रपट ‘गुडबाय’ चे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन ( Goodbye collection ) समोर आले आहे. हा चित्रपट देखील खास आहे . कारण, हा चित्रपट पुष्पा फेम रश्मिका मंदान्नाचा बॉलिवूड डेब्यू आहे. पंरतु, चित्रपटाच्या पहिल्या दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून रश्मिकाची जादू चालणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

बिग बी, अमिताभ बच्चन आणि रश्मिका दोघेजण पहिल्यांदा या चित्रपटात एकत्रित दिसले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी चित्रपटातील एक लूक शेअर करत चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली होती. यानंतर ठरल्याप्रमाणे ७ ऑक्टोबर २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आता पहिल्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. ( Goodbye collection )

सुूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी रश्मिका आणि अमिताभ बच्चन यांचा ‘गुडबाय’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.२ कोटी रूपयांची कमाई केली. परंतु, ‘गुडबाय’ चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या केलेल्या कमाईने मात्र, निर्मात्यांची निराशा झाली आहे. यानंतर सुट्टीच्या दिवशी म्हणजे, रविवारी हा चित्रपट भरघोष कमाई करेल असी आशा निर्मात्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विकास बहल यांचा हा चित्रपट फॅमिली ड्रामावर आधारित आहे. ‘गुडबाय’ ला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. परंतु, पहिल्या दिवशी चाहत्यांनी चित्रपट पाहण्यात फारसा रस दाखवला नाही.

Goodbye Trailer | Latest Bollywood News | Top News of Bollywood - Bollywood Hungama

हेही वाचलंता का? 

Back to top button