Sonalee Kulkarni : लव्हली लिंबू 😍; अप्सरेची साडी लिंबू कलरची नव्हे तर... | पुढारी

Sonalee Kulkarni : लव्हली लिंबू 😍; अप्सरेची साडी लिंबू कलरची नव्हे तर...

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठीची अप्सरा आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ( Sonalee Kulkarni ) नेहमी सोशल मीडियावर तिचे एकापेक्षा एक हॉट फोटो शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते. सध्या आणखी एका लिंबू आणि काठाला चॉकलेटी रंगाच्या साडीनं चाहत्यांना भूरळ घातली आहे. सोनालीच्या या फोटोवर चाहत्यांनी ‘लिंबू कलरची साडी खूपच खुलून दिसतेय’, ‘नजर काढण्यास मिरची पाहिजे’, ‘लव्हली लिंबू 😍’, ‘लिंबू कलरची साडी 🥻,,,,हसताच चांदनी 🎶 लाजतात मोहिनी🎵😍 सिंपलमध्ये डिंपल 😍😍’, यासारख्या अनेक कॉमेन्टस चाहत्यांनी केल्या आहेत.

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ( Sonalee Kulkarni ) ने तिच्या इन्स्टाग्रामवर सहा वारी साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. यात सोनालीचे सौंदर्य लिंबू कलरच्या साडीत खुलून दिसतेय. यातील खास म्हणजे, सोनालीने लिंबू कलरच्या साडीवर त्याच रंगाचे सिव्हलेस ब्लॉऊज परिधान केलं आहे. मोकळे केस, रेड लिपस्टिक, हातात अंगठीने तिच्या सौदर्यात भर पडली आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘फक्त लिंबू कलरची साडीच नव्हे तर…’ (‘Not just लिंबू colour ची saree…. When life gives you lemons 🍋make a #saree out of them 🥻’) असे म्हटलं आहे. यावरून सोनालीने नक्कीच लिंबू कलरची साडी नेसली आहे की आणखी कोणत्या रंगाची ? याबाबत चाहत्यांनी वेगवेगळे तर्क- वितर्क लावले आहेत. या फोटोच्या मागे सुंदर रस्ता आणि हिरवीगार झाडी खूपच आकर्षक दिसत आहे. यात सोनालीचा साधा लूक आणि मादक अदा चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने ‘अशी ही बनवाबनवीमधील अशोक सराफांचा डायलॉग आठवला, लिंबू कलर मस्त दिसतो’ असे म्हटंल आहे. तर काही नेटकऱ्यांनी ‘Beautiful look and nice eyes aur red lipstick & smile’, ‘लिंबू कलरची साडी खूपच खुलून दिसतेय’, ‘Uffff🔥🔥’, ‘Very Nice Butiful Awesome Cool 😍😍’, ‘Super duper gorgeous❤️ love and hugs’, ‘❤️ wow’, ‘Beautiful 🔥🔥❤️❤️😍’, ‘❤️❤️Gorgeous’, ‘Mast🔥’, ‘Hot🔥😍😘♥️’, ‘Gorgeousness 💞🥰😍😍😍❤️✨’, ‘अप्सरा आली इंद्रपुरीतुन खाली 👌’, ‘Sweet & hot in same pic…. awesome 🔥❤️’, ‘खूप छान दिसतात तुम्ही❤️❤️😍😍’, ‘अती मोहक अशी ‘, ‘लिंबू नाही संत्री दिसताय’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत जवळपास ५० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Back to top button