Kamal Haasan : 'चोल साम्राज्यावेळी नव्हता हिंदू धर्म'; कमल हासन यांच्या विधानाने वाद | पुढारी

Kamal Haasan : 'चोल साम्राज्यावेळी नव्हता हिंदू धर्म'; कमल हासन यांच्या विधानाने वाद

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक मणिरत्नम यांचा चित्रपट ‘पोन्नियिन सेल्वन -१’ रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. परंतु, आता या चित्रपटावरून वाद वाढताना दिसत आहे. चित्रपटावरून तमिळ सुपरस्टार कमल हासन यांनी केलेल्या विधानावरून वाद वाढताना दिसत आहे. पोन्नियिन सेल्वन या PS-1 हा तमिळ चित्रपट ३० सप्टेंबरला रिलीज झाला. याचा दुसरा भाग २०२३ मध्ये रिलीज होणार आहे. (Kamal Haasan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करत आहे. हा चित्रपट राजराजा चोलनशी प्रेरित कल्किच्या काल्पनिक उपन्यासवर आधारित आहे. चित्रपट रिलीज होताच वाद सुरू झाला. दिग्दर्शक वेत्रिमारनने चित्रपटाविषयी कॉमेंट करतावा म्हटले की, चोल किंग राज राजा प्रथम एक हिंदू राजा नव्हता. चोल साम्राज्याच्यावेळी कोणताही ‘हिंदू धर्म’ नावाचा धर्म नव्हता. (Kamal Haasan)

हे विधान बघता बघता व्हायरल झाले. आता सुपरस्टार कमल हासनदेखील त्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.

कमल हासन यांनी एका कार्यक्रमात म्हटलं की, ‘राज राजा चोलच्या काळात कोणताही हिंदू धर्म नव्हता. त्यावेळी वैष्णव, शैव संप्रदाय होते. हे तर इंग्रज होते, ज्यांनी हिंदू म्हणणं सुरू केलं. कारण, त्यांना त्यांच्याविषयी फारशी माहिती नव्हती. हे त्याचप्रमाणे आहे, जसे की त्यांनी तुतुकुडीचं नाव बदलून तुतिकोरिन केलं.’ कमल हासन यांनी हेदेखील सांगितलं की, त्यावेळी अनेक प्रकारचे संप्रदाय होते.’ कमल हासन हे कलाकार आणि क्रूटीमसोबत पोन्नियिन सेलवन पाहायला गेले होते. यावेळी ते म्हणाले, हे इतिहासावर आधारित एका कथेचा उत्सव साजरा करण्याचा क्षण आहे. ‘इतिहास तोडून मोजून सादर करू नये.

या कार्यक्रमात दिग्दर्शक वेत्रिमारन म्हणाले, ‘सातत्याने आमची ओळख आमच्यापासून हिसकावून घेतली जात आहे. वेत्रिमारन यांचे हे वक्तव्य निर्माते मणिरत्नम यांचा चित्रपट पोन्नियिन सेलवन-१ रिलीज झालयानंतर आले होते. त्यानंतर धार्मिक ओळखीवरून वाद सुरु झाला.

दिग्दर्शक वेत्रिमारन यांच्या विधानावर भाजपे नेते एच राजा भडकले. ते म्हणाले, ‘मला वेत्रिमारनप्रमाणे इतिहास चांगल्या प्रकारे माहिती नही. पण, राजराजा चोलने स्वत:ला शिवपाद सेकरनदेखील म्हटलं होतं. मग, ते हिंदू कसे नाही?’

या बिग बजेटच्या मल्टीस्टारर चित्रपटात ५ वर्षांनी बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) ने मोठ्या पडद्यावर वापसी केलीय. या चित्रपटात तृषा, विक्रम, जयराम रवि यासारखे मोठे कलाकार आहेत.

Back to top button