Gauri Khan B’day : गौरी खान आहे इतक्या संपत्तीची मालकीण, स्वत: कमावते इतके पैसे
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची सुंदर पत्नी गौरी खान आज ५२ वर्षांची झाली. (Gauri Khan B'day) तिचा जन्म ८ ऑक्टोबर १९७० रोजी नवी दिल्ली येथे झाला होता. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे प्रोफेशन, संपत्ती आणि खऱ्या नावाबद्दल जाणून घेऊया. (Gauri Khan B'day)
गौरी खानचं करिअर
गौरी खान बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची पत्नी आहे. तिला कुठल्याही ग्लॅमरची गरज नाही. कारण ती स्वत : इंटिरियर डिझायनर आहे. तिने आपली एक वेगळी ओळख बनवलीय. या सुंदर डिझायनरने देशातील अनेक हाय-प्रोफाइल सेलेब्रिटींचं घर आणि ऑफिसचे इंटिरियर डिझाईन केले आहे. याशिवाय ती प्रोडक्शन कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटची को-फाऊंडर आहे आणि को-चेअरपर्सनदेखील आहे.
देश-परदेशातील प्रसिद्ध सेलेब्स गौरी खानकडून आपल्या घराचे इंटिरियर डिझाईन करण्यासाठी उत्साहित असतात. फॉर्च्युन मॅगजीननुसार तिचा '५० सर्वात पॉवरफूल महिला'मध्ये समावेश आहे.
गौरी खानचे शालेय शिक्षण दिल्लीच्या लॉरेटो कॉन्व्हेंट स्कूलमधून झाले. त्यानंतर तिने मॉडर्न स्कूल वसंत विहार, दिल्ली येथून हायस्कूलचे शिक्षण घेतले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर गौरीने दिल्लीतील सर्वात लोकप्रिय महाविद्यालयांपैकी एक असलेल्या लेडी श्री राम कॉलेजमधून बीए केले. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून फॅशन डिझायनिंगचा ६ महिन्यांचा कोर्सही केला. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तिने तिच्या वडिलांच्या गारमेंटच्या व्यवसायात लक्ष घातले. यादरम्यान तिने काही काळ टेलरिंग कामही शिकले.
गौरी खानची एकूण संपत्ती
गौरी खानबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल की तिचे खरे नाव गौरी छिब्बर आहे. शाहरुख खानशी लग्न केल्यानंतर तिने तिच्या नावापुढे खान लावले. मीडिया रिपोर्टनुसार, तिच्या एकूण संपत्ती १६०० कोटी आहे. गौरी खान मुंबईतील सर्वात महागड्या आणि प्रसिद्ध बंगला 'मन्नत'मध्ये राहते. तिच्या या घराची किंमत सुमारे २०० कोटी आहे. याशिवाय तिच्याकडे लक्झरी कार कलेक्शन आहेत. तिच्याकडे सुमारे २.२५ कोटींची 'बेंटले कॉन्टिनेंटल' कार आहे.

