आई कुठे काय करते : रुपाली भोसलेच्या बदललेल्या लूकचं रहस्य उलगडलं | पुढारी

आई कुठे काय करते : रुपाली भोसलेच्या बदललेल्या लूकचं रहस्य उलगडलं

पुढारी ऑनलाईन : ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेच्या वेगवेगळ्या लूकची नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच रुपालीने तिचा वेगळ्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. रुपालीने हा लूक नेमका कशासाठी केला आहे? याची तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. या फोटोमागचं खरं रहस्य आता समोर आलं आहे.

रुपालीचा हा अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यामध्ये. ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातील ‘ हृदयी वसंत फुलताना’ या गाण्यावर रुपाली परफॉर्म करणार आहे. याच परफॉर्मन्साठी रुपालीने सुप्रिया पिळगावकर यांच्या चित्रपटातील लुकशी मिळताजुळता लूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

या परफॉर्मन्ससाठी रुपाली अतिशय उत्सूक असून असा हटके प्रयोग तिने पहिल्यांदाच केला आहे. सुप्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधानसोबत रुपाली या सदाबहार गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. तेव्हा रुपालीचा हा हटके अंदाज चाहत्यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button