

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रिया प्रकाश वॉरियर साऊथ चित्रपटांतील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी सोशल मीडियावर खूप ॲक्टिव असते. तिचे फोटो आणि व्हिडिओदेखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. प्रिया प्रकाश वारियर (Priya Warrier ) फॅन्ससाठी खास फोटो आणि व्हिडिओदेखील शेअर करते. आता ती लेटेस्ट फोटोंवरून चर्चेत आलीय. या फोटोंमध्ये ती खूप ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. प्रिया प्रकाश वॉरियरने समुद्र किनारी शॉर्टमध्ये फोटोशूट केला आहे. प्रियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव केलाय. (Priya Warrier )
तिने आपले काही फोटो शेअर केल्यानंतर त्याला ???? ही इमोजींची कॅप्शन दिलीय. तिचे फोटो पाहून नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस होतोय. प्रियाचं हास्य मनमोहक आहे. तिचा हा लूक ग्लॅमरस दिसतोय. प्रिया प्रकाशने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काल समुद्रातील काही फोटो शेअर केले होते. व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. त्याआधी तिने आपले दोन फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो स्विमिंग पुलाचे आहेत. फोटोंमध्ये प्रिया बिकिनीमध्ये स्विमिंग पुलमध्ये दिसते. तिच्यामगे इमारतीचा सुंदर व्ह्यू दिसत आहे. प्रिया स्विमिंग पुलात खूप सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर प्रियाचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत. प्रियाचे हे फोटो फॅन्सच्या पसंतीस उतरले आहेत.
प्रिया प्रकाशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अलीकडेच तिने एका नवीन चित्रपटाची घोषणा केली. त्याच्या नवीन चित्रपटाचे नाव गायत्री आहे. अभिनेत्रीने यापूर्वी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली होती. प्रिया प्रकाश वारियरने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझी पुढची गायत्री.' अभिनेत्रीचे चाहते तिच्या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत.