चीनमध्ये लष्करी उठाव झाल्याच्या जोरदार चर्चा; ट्विटवर ट्रेंड सुरू (xi jinping) | पुढारी

चीनमध्ये लष्करी उठाव झाल्याच्या जोरदार चर्चा; ट्विटवर ट्रेंड सुरू (xi jinping)

चीनमध्ये लष्करी उठाव झाल्याच्या जोरदार चर्चा; ट्विटवर ट्रेंड सुरू

पुढारी ऑनलाईन – राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांना चिनी लष्कराने ताब्यात घेतले असून, चीनमध्‍ये लष्कराने उठाव केला आहे, अशी जाेरदार चर्चा ट्विटरवर सुरू आहे. चीनच्या पिपिल्स लिबरेशन आर्मीने जिनपिंग यांची सत्ता उलथावली आहे. लष्करप्रमुख जनरल लिक्वी ओमिंग नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत, असेही ट्विटरवर शेअर केले जात आहे; पण या वृत्ताला  कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

या चर्चामुळे ट्विटरवर क्षी जिनपिंग हे ट्रेंडमध्ये आले असून, तासाभरात सात हजारावर ट्विट या ट्रेंडने झाले आहेत. जेनिफर झेंग या ट्विटर युजरने चिनी लष्काराचा ताफा बीजिंगकडे जात असल्याचा व्हिडिओही ट्विट केला आहे.

लेखक एडी हॉब्ज यांनी असे जर घडले तर त्याचे फार मोठे भूसामरिक परिणाम घडतील, असे मत व्यक्त केले आहे. तर योगेश कुमार या युजरने चीनमधील ६० टक्के विमान उड्डाणे रद्द केलेली आहेत, त्यामुळे चीनमध्ये काही तरी गंभीर घडत असल्याचा संशय येतो, असे मत व्यक्त केले आहे.

तर पत्रकार पलकी शर्मा यांनी चीन संदर्भातील बातम्या या अपरिपक्व आणि अवास्तव आहेत, असे म्हटलं आहे.

हेही वाचा

Back to top button