Bhagya Dile Tu Mala : क्यूट कावेरी ❤️; साधी दिसणारी तन्वी खूपच ग्लॅमरस | पुढारी

Bhagya Dile Tu Mala : क्यूट कावेरी ❤️; साधी दिसणारी तन्वी खूपच ग्लॅमरस

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘भाग्य दिले तू मला’ ( Bhagya Dile Tu Mala ) ही मालिका चाहत्याच्या घराघरांत पोहोचली आहे. या मालिकेत मुख्य कावेरीची भूमिका अभिनेत्री तन्वी मुंडले उत्तमरित्या साकारली आहे. तिच्या भूमकेचे सर्वत्र कौतुक केले आहे. परंतु, या मालिकेत साधी भोळी आणि संकटाचा सामना करणारी कावेरी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस दिसतेय.

‘भाग्य दिले तू मला’ ( Bhagya Dile Tu Mala ) ही मालिका सध्या नव्या वळणार येवून पोहोचली आहे. एकीकडे कावेरीचे अपहरण करून एका बंद खोलीत ठेवल्याचे दाखवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे तिच्यावर कंपनीत घोटाळा केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अपहरणकर्त्यांनी कावेरीला चाकूचा धाक दाखवत घाबरविले आहे. याच दरम्यान कावेरीच्या मदतील पोलिस येतात. पण तिला घरी न सोडता घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी पोलिस ठाण्यात घेवून जातात. तिचे कावेरीची चौकशी सुरू होते.

यावेळी पोलिस कोठडीत राजवर्धन तिला सोडवण्याचे वचन देतो. यामुळे या मालिकेत कावेरी या प्रकरणातून सुटका होते की नाही? यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. परंतु, मालिकेत दिसणारी साधी भोळी कावेरी म्हणजे, अभिनेत्री तन्वी मुंडले रिअल लाईफमध्ये खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

अभिनेत्री तन्वी मुंडले ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतून पहिल्यादा छोट्या पडद्यावर पदार्पण केलंय. तन्वी मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळची आहे. ‘बाबा वर्धम्’ या नाटकाच्या ग्रुपमधून तिनं अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. तन्वीने बीएसस्सी फिजिक्सची पदवी पूर्ण केली आहे. या सगळ्यासोबत तन्वीच्या इन्स्टाग्रामवर नवनविन फोटोज आणि व्हिडिओज पाहायला मिळतात. यातील प्रत्येक फोटोत तन्वीचा निखल हास्य, गोंडस चेहरा, मनमोहक अंदाजात ती क्यूट दिसतेय.

‘Chhan 🧡’, ‘So Beautiful looking 😍😍’, ‘Goad❤️’, ‘तुम्ही साडीमध्ये खूप भारी दिसतात😍’, ‘खूपच सुंदर 👌👌’, ‘Lookinh cute ❤️❤️’, ‘खुप गोड दिसतेस ❤️❤️’, ‘Sizzling eyes cute smile killer eyebrows❤️❤️❤️❤️’, ‘Tu kiti cute aahe tai❤️’, ‘Gorgeous❤😍’, ‘Cute distes….❤️❤️’, ‘Looking gorgeous 🔥❤️’, ‘Sweet girl❤️❤️’. यासारख्या अनेक कॉमेन्टसनी बॉक्स भरला आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. तिचे सोशल मीडियावर १ लाखांहून अधिक फालोव्हर्स आहेत.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by SSK (@swapnil.khare_)

 

View this post on Instagram

 

A post shared by SSK (@swapnil.khare_)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tanvi Prakash Mundle (@tanvimundle)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Sane (@saneshashank)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tanvi Prakash Mundle (@tanvimundle)

Back to top button