आळंदीत इंद्रायणीची पाणी पातळी वाढली

आळंदीत इंद्रायणीची पाणी पातळी वाढली

आळंदी; पुढारी वृत्तसेवा: गेल्या चार दिवसांपासून पडणार्‍या मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. इंद्रायणी नदी घाटावरील भागीरथी कुंड पाण्याखाली गेले आहे तर भक्त पुंडलिक मंदिरात पाणी शिरले आहे. भक्ती सोपान पुलाला पाणी लागले आहे. पूल कधीही पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घाटावर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.

मावळात आंद्रा धरण परिसरात सलगच्या मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे इंदोरी, निघोजे, देहू, खालुंब्रें, चिखली, मोशी, मोई, कुरुळी, चिंबळी, डुडुळगाव, आळंदी, चर्‍होली गावचे नदीकाठ पुराने भरून गेले असून नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे नदीचे स्वच्छ रूप पाहायला नागरिक गर्दी करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news