औरंगाबाद : नवगावात रस्ते काँक्रीट मिक्सरच्या टायरखाली सापडून तरुण जागीच ठार | पुढारी

औरंगाबाद : नवगावात रस्ते काँक्रीट मिक्सरच्या टायरखाली सापडून तरुण जागीच ठार

पैठण (औरंगाबाद) : पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील नावगाव येथे रस्त्याचे काम चालू असताना काँक्रेट मिक्सरच्या वाहनाच्या टायरखाली सापडून तरुण जागीच ठार झाला. आज ( दि १५) दुपारी ही दुर्घटना घडली. गुलाब इस्माईल शेख (वय ४०, रा. कुराणपिंपरी, ता. पैठण) असे मृताचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील नवगाव येथे नवगाव बस स्थानक ते ग्रामपंचायत कार्यालया पर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. आज दुपारी नेहमीप्रमाणे गुलाब शेख नावगाव येथे जात असताना रस्त्याच्या कामाचे काँक्रीट मिक्सरच्या टायरखाली आला. यामध्ये  ताो जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक नावगाव गावात दाखल झाले.

दरम्यान नवगाव येथे रस्त्याच्या कामावरील काँक्रीट मिक्सरच्या टायरखाली बघून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्यामुळे. पैठण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे, पोलीस उपनिरीक्षक सतीश भोसले, पो ना भगवान धांडे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सदरील व्यक्तीचा मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.

हेही वाचा : 

Back to top button