Jon Franko : राजीनामा द्या, बक्षीस मिळवा!, ‘ही’ कंपनी राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना देणार वेतन वाढ | पुढारी

Jon Franko : राजीनामा द्या, बक्षीस मिळवा!, 'ही' कंपनी राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना देणार वेतन वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्क : कंपनी सोडणासाठी कर्मचाऱ्यांना बक्षीस आणि नोटीस कालावधी दरम्यान मिळणाऱ्या वेतनात १० %  वाढ मिळेल, हे वाचून आश्चर्य वाटलं ना? पण तुम्ही वाचताय ते खरं आहे. अमेरिकेतील एका मार्केटिंग कंपनीने असा निर्णय  घेतला आहे. या निर्णयाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. जाणून घेवूयी  Jon Franko कंपनीच्या नव्या घोषणेविषयी…

Jon Franko : १० % वेतनात वाढ 

अमेरिकेतील गोरिल्ला मार्केटिंग कंपनीचे संस्थापक फ्रँको यांनी एक भन्नाट निर्णय घेतला आहे. लिंक्डीन (Linkedin) वर जॉन फ्रेंको यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “ज्याक्षणी  एखादा पूर्ण वेळ काम करणारा कर्मचारी गोरिला कंपनी सोडण्याच्या निर्णयाबाबत कंपनीला सांगेल. तसेच सहा आठवड्यांची नोटीस कालावधी देतील, अशा कर्मचाऱ्यांना वेतनात 10% वाढ होईल.”

फ्रेंको यांनी म्हटलं आहे की, मी घेतलेला निर्णय कर्मचाऱ्यांना  प्रोत्साहन देईल. कंपनी सोडून जाणारे लोक आम्हाला काही दिवस आपला निर्णय सांगतात त्यामुळे कंपनी कसे पुढे जाईल यासाठी निर्णय घेवू शकते. आमची इच्छा नसते की, आमच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला सोडून जावे; पण कोणी आमच्यासोबत कायमस्वरुपी सोबत राहतील आणि आमच्यासोबत सेवानिवृत्ती घेतील, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.

आपल्या लिंक्डीन पोस्टमध्ये फ्रेंको म्हटलं आहे की,  “अलीकडेच एका कर्मचाऱ्याने आमची कंपनी सोडली. ती व्यक्ती आमच्या गोरिला कंपनीतील प्रतिभासंपन्न आणि महत्त्वपूर्ण व्यक्ती होती. तो काहीतरी वेगळ  करु पाहत होता. तो आमच्याकडे आला आणि आम्हाला सांगितले की, तो नोकरी सोडत आहे आणि तीन महिन्यात निघून जाईल. त्याच्या पगारात आम्ही 10% वाढ केली. त्या व्यक्तीच्या जागी दुसरा व्यक्ती शोधू लागलो. या पदासाठी आम्हाला योग्य व्यक्ती मिळाली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button