Actress Pregnancy : हनीमूनचा पत्ता नाही अन् चाहते मात्र प्रेग्नेन्सीची पाहताहेत वाट! | पुढारी

Actress Pregnancy : हनीमूनचा पत्ता नाही अन् चाहते मात्र प्रेग्नेन्सीची पाहताहेत वाट!

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे, ऐश्वर्या शर्मा, गायिका नेहा कक्कड, अभिनेत्री मौनी राय यांचे आधी लग्न आणि नंतर प्रेग्नेंसीच्या वृत्ताची चाहते आतुरतने वाट पाहत आहेत. या यादीत टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्यादेखील मागे नाही. (Actress Pregnancy) या नवविवाहितांचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांची नजर अभिनेत्रींच्या प्रेग्नेंसीवर टिकून राहिली आहे. एखादी अभिनेत्री प्रेग्नेंट असेल तर ते वृत्त वाऱ्यासारखे पसरते. शिवाय चाहत्यांच्या शुभेच्छांनी कमेंट बॉक्स भरून जातो. यातील काही अभिनेत्री प्रेग्नेंसीच्या अफवांमध्ये अडकल्या. या यादीत श्रद्धा आर्यापासून अंकिता लोखंडेपर्यंत आणि बरेच काही आहेत. सर्व अभिनेत्रींना मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स मिळतात आणि गेल्या काही महिन्यांत त्यांचे लग्न झाले आहे. आणि त्यांचे चाहते त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या पुढच्या टप्प्याची, पालकत्वाची वाट पाहत आहेत. (Actress Pregnancy)

ऐश्वर्या शर्मा

गुम है किसके प्यार में या शोमध्ये ऐश्वर्या शर्मा उर्फ ​​पाखी ही विनायकच्या आईची भूमिका साकारत आहे. अभिनेत्रीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिचा कोस्टार नील भट्टसोबत लग्न केले होते. पण, ती प्रेग्नेंसीच्या अफवांपासून वाचली आहे. अभिनेत्रीने अलीकडेच इतके बिझी शेड्यूल असल्याचे उघड केले. चक्क ती आणि नील अद्यापही हनीमूनला गेलेले नाहीत, असे तिने म्हटले आहे. ‘घुम है किसीके प्यार में’ च्या सेटवर मुलांसोबतचे तिचे बॉन्ड पाहून, कोणीही अंदाज लावू शकतो की तिला मुले खूप आवडतात.

अंकिता लोखंडे

पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या प्रेग्नेंसीची अफवा आधीच पसरली होती. तिने ढिले कपडे घातल्याने चाहते अंदाज लावू लागले. अंकिताने पडद्यावर आईची भूमिका साकारली असून चाहत्यांनी तिच्या भूमिकेवर प्रेम केले आहे. खऱ्या आयुष्यातही अंकिताची आई म्हणून ते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. तथापि, अभिनेत्रीने नुकतेच सांगितले की, ती स्वतः अजून एक छोटी बच्ची आहे. अंकिताने गेल्या वर्षी विकी जैनसोबत लग्न केले आहे.

करिश्मा तन्ना

करिश्मा तन्ना या वर्षी तिचा प्रियकर वरुण बंगेरासोबत विवाहबद्ध झाली. ही अभिनेत्री टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय दिवा आहे. त्यांचा विवाह हा एक खासगी सोहळा होता, या सोहळ्यात जवळची मंडळी होती. आता आईच्या रुपात तिला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मौनी रॉय

मौनी रॉयने याच वर्षी गोव्यात सूरज नांबियारशी लग्न केले. तिने ब्रह्मास्त्र चित्रपटात देखील काम केले आहे. ती आणि सूरज देखील कामात बिझी आहेत. दोघे खूप हॉट कपल आहेत. आता चाहते मौनीला आईच्या भूमिकेत पाहण्यास उत्सुक आहेत.

नेहा कक्कड

नेहा कक्कडदेखील प्रेग्नेंट असल्याचे वृत्त समोर आले होते. तिचे वजन वाढल्याचे दिसताच चाहत्यांनी तर्क लढवायला सुरुवात केली होती. नेहाने रोहनप्रीत सिंगसोबत लग्न केले आहे.

श्रध्दा आर्या

कुंडली बाग्य फेम श्रध्दा आर्याने नेव्ही कमांडर राहुल नागलसोबत गेल्यावर्षी लग्नगाठ बांधलीय. नंतर ती प्रेग्नेंट असल्याच्या अफवा पसरल्या. रिल्स व्हिडिओमध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसल्याने चाहत्यांनी ती प्रेग्नेंट असल्याचे म्हटले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vihan Verma (@vihansometimes)

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

Back to top button