Genelia DSouza : जेनेलियाचा कलरफूल आऊटफिटमध्ये कूल अंदाज

genelia
genelia
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जेनेलियाचे डिसुझा-देशमुख (Genelia DSouza) ची फॅशन स्टाईल जबरदस्त आहे, त्यामुळेच तर ती खूप चर्चेत आलीय. तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कलरफूल ड्रेसमध्ये दिसतेय. खास कलरफूल आऊटफिटमध्ये जेनेलियाने फोटोशूट केलंय. परफेक्ट मेकअप आणि हेअरस्टाईल लूकमुळे ती खूप सुंदर दिसतेय. तिच्या याफोटोंतून तिने ग्लॅमरचा तडका लावला आहे. ती नेहमी तिचा पती आणि अभिनेता रितेश देशमुखसोबत अनेक व्हिडिओ, रिल्समध्ये दिसते. अगदी कुल अंदाजात जेनेलियाचा लूक लक्ष वेधून घेणारा आहे. (Genelia DSouza)

तिचा लस्टनिंग लूक सर्वांनाच आकर्षित करणारा आहे. लाईट मेकअपमध्ये तिच्या कातिल अदा पाहायला मिळत आहे. देसी असो वा वेस्टर्न लूकमध्ये ती सर्व आऊटफिट्समध्ये शोभून दिसते.

बॉलिवूडशिवाय तिने साऊथ चित्रपटांमध्येही काम केलंय. जेनेलिया दोन हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसमार आहे. 'मिस्‍टर मम्‍मी' आणि 'ट्रायल पीरियड' अशी चित्रपटांची नावे आहेत. तर एका अनटायटल्‍ड कन्‍नड-तेलुगू चित्रपटामध्येही ती दिसेल. ती मराठी चित्रपट 'वेद' मध्येही दिसणार आहे. तिचा हा पहिला चित्रपट आहे. रितेश देशमुख या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

१० वर्षांनंतर कमबॅक

१० वर्षांनंतर ती चित्रपटांमध्ये कमबॅक करायला सज्ज आहे. जेनेलियाने एका मुलाखतीत कमबॅक विषयी सांगितलं आहे. ती खूप उत्सुकआहे आणि नर्व्हसदेखील असल्याचे ती म्हणते. पण अभिनय आणि कॅमेऱ्यासमोर उभे राहणे तिच्यासाठी कठीण नाही. १० वर्षांच्या ब्रेकदरम्यान, तिने आपल्या फॅमिलीकडे संपूर्ण लक्ष दिले आहे.

जेनेलिया म्हणाली- खूप सपोर्टिव्ह आहे नवरा

जेनेलिया म्हणाली, तिचा पती रितेश देशमुख खूप सपोर्टिव्ह आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते दोघेही एकमेकांच्या वेळा लक्षात घेऊन त्यांचे वेळापत्रक आखण्याचा प्रयत्न करतात.

रितेश-जेनेलिया इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल आहेत. दोघांचे ट्युनिंग-बॉन्डिंग कमालीचे आहे. दोघे सोशल मीडियावरदेखील खूप ॲक्टिव्ह राहतात. फनी रिल्स बनवण्यात ते माहीर आहेत. त्याशिवाय दोघांचे फॅशन सेन्स क्लासी आणि कूल असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news