सुख म्हणजे नक्की काय असतं : गौरीच्या डोहाळे जेवणात शालिनी साधणार डाव | पुढारी

सुख म्हणजे नक्की काय असतं : गौरीच्या डोहाळे जेवणात शालिनी साधणार डाव

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत शालिनी नवा डाव साधणार आहे. शालिनीने गौरीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात नवा डाव आखलाय. शालिनीचे गौरीविरोधात नेहमी कट कारस्थान सुरू असते. यंदाही गौरीला जखमी करायचा डाव शालिनीने आखलाय. शिर्के-पाटलांच्या घरात आनंदाचा सोहळा आहे. गौरी प्रेग्नेंट आहे. शिर्के-पाटील यांच्या घरात गौरीच्या डोहाळे जेवणाचा समारंभ सुरू आहे, पण, या सोहळ्यात शालिनी काय मीठाचा खडा टाकणार, हे मालिका पाहिल्यानंतरचं कळेल.

गौराबाई उखाणा घ्या, असं म्हणताचं गौरी उखाणा घेते. ती म्हणते-‘काय काय खरं खोटं कानावर पडत असेल बाळ्याच्या, जयदीपरावांच्या संस्कारात माझं बाळ होणार मोठं’

तोपर्यंत मागे ऐकू येतं की-‘नट ढिला केलाय नव्हं’? यावर शालिनी म्हणते-‘तू फक्त मज्या बघ’. तोपर्यंत जयदीप गौरीला झुला झुलवतो. गौरीने गुलाबी रंगाची साडी आणि त्यावर फुलांचे दागिने घातले आहेत. गौरीची सासू म्हणजेच अभिनेत्री वर्षा  उसगावकर देखील डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात आनंदाने डान्स करताना दिसते. तोपर्यंत झुला ढिला होतो आणि तो खाली पडतो. घाबरून गौरी बेशुद्ध होते.

आता गौरी आणि गौरीचे बाळ सुरक्षित असेल का? शालिनी तिच्या कारस्थानात यशस्वी होईल का? तिचा कट उघडकीस येईल का? हे मालिका पाहिल्यानंतर कळेल.

गौरीची भूमिका अभिनेत्री गिरीजा प्रभूने साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Back to top button