Alia Bhatt And Ranbir Kapoor : ‘ब्रह्मास्त्र’चे साऊथमध्ये जोरदार बुकिंग; जाणून घ्या का होतंय ‘असं’… | पुढारी

Alia Bhatt And Ranbir Kapoor : ‘ब्रह्मास्त्र’चे साऊथमध्ये जोरदार बुकिंग; जाणून घ्या का होतंय ‘असं’...

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या बॉलिवूडला एक प्रकारे ग्रहण लागले आहे. बॉलिवूडचा बहुधा हा सर्वात वाईट काळ असावा. सध्या बॉलिवूडचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होवो किंवा कोणत्याही बढ्या स्टारचा चित्रपट असो तो फ्लॉपच होत आहे. जणू या चित्रपटांच्या आणि बॉलिवूडच्या मागे राहू – केतुचा काळच लागला आहे. प्रेक्षकांना बॉलिवूडच एक देखिल चित्रपट पसंती उतरत नाही, उलट अनेक चित्रपट हे साऊथ आणि हॉलिवूडच्या चित्रपटांची कॉपी असते त्यामुळे त्याकडे पाठ फिरली जात आहे. दुसरीकडे बॉलिवूडचे प्रेक्षक खासकरुन हिंदी बेल्टमधील प्रेक्षक साऊथच्या चित्रपटांवर भरभरुन प्रेम करत आहेत. त्यामुळे साऊथचे पॅन इंडिया चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहेत. यामुळे एकप्रकारे बॉलिवूडवर सध्यातरी संक्रात आली आहे असेच म्हणावे लागेल. (Alia Bhatt And Ranbir Kapoor)

दरम्यान एकीकडे बॉलिवूडचे चित्रपट धडाधड पडत आहेत. काही चित्रपटांना जाणून बुजून ट्रोल केले जात आहे. नव्या चित्रपटाचा ट्रिझर अथवा ट्रेलर जरी लॉन्च झाला तर त्याला देखिल नापसंती दर्शवली जात आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण हा चित्रपटही फ्लॉप झाला. चित्रपटाच्या निर्मितीचे आणि आशयाचे कौतुक झाले असले तरी त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात आला होता, हेच मुख्य कारण फ्लॉपसाठी ठरले. परफेक्शनिस्ट अमिर खानचे आतापर्यंतचे चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडले असले तरी आता चाहत्यांच्या नजरा आलिया रणबीरच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाकडे लागल्या आहेत. सोशल मीडियावर सुरू असलेल्या बहिष्काराच्या ट्रेंडच्या निशाण्यावर हा चित्रपटही आला आहे, असे असताना ‘ब्रह्मास्त्र’साठी एक आशेचा किरण म्हणावी अशी बातमी समोर आली आहे.

‘ब्रह्मास्त्र’च्या आगाऊ बुकिंगला प्रतिसाद (Alia Bhatt And Ranbir Kapoor)

काही काळापासून हिंदी चित्रपटसृष्टीबाबत लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मोठ्या स्टारकास्ट आणि बिग बजेट चित्रपटांवर लोक बहिष्कार टाकत आहेत. सोशल मीडियावर नकारात्मक वातावरण आहे. स्टार्सची जुनी वक्तव्ये सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांच्याविरोधात वातावरण तयार केले जात आहे. यामुळेच आमिर खान, अक्षय कुमार आणि रणबीर कपूर यांचे चित्रपटही फ्लॉप झाले. पण, रणबीर कपूरच्या आगामी ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या आगाऊ बुकींगला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाचे जबरदस्त आगाऊ बुकिंग सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटासाठी एक लाखाहून अधिक सीट्स बुक करण्यात आल्या आहेत. रणबीर कपूर-आलिया भट्ट स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ च्या हिंदी आवृत्तीने आगाऊ बुकिंगद्वारे 3.87 कोटी रुपये कमावले आहेत.

ब्रह्मास्त्रचे बुकींग कमाई (Alia Bhatt And Ranbir Kapoor)

मुंबई 33.65 लाख, दिल्ली -50.23 लाख, पुणे – 13.49 लाख, कोलकाता – 13.02 लाख, अहमदाबाद – 4.11 लाख बुकिंग झाले आहेत.

ब्रह्मास्त्रला साऊथमध्ये मिळतो अधिक प्रतिसाद

एकीकडे संपूर्ण भारतात फक्त साऊथच्या चित्रपटांचीच क्रेझ पहायला मिळत आहे. तिकडचे पॅन इंडिया प्रदर्शित होणार रेकॉर्डब्रेक कमाई करत आहेत. यामुळे बॉलिवूडचे चित्रपट फ्लॉप ठरत असताना मात्र साऊथमध्ये ब्रह्मास्त्रला घेऊन अधिक उत्सुकता पहायला मिळत आहे. याचे एक कारण या चित्रपटात साऊथचा सुपर स्टार नागार्जुन देखिल विशेष भूमिकेत पहायला मिळणार आहे. अनेक वर्षांनी या चित्रपटाद्वारे नागार्जुन बॉलिवूडमध्ये पुन्हा येत आहे. त्यामुळे नागार्जुनच्या एन्ट्रीची सर्वांना जशी उत्सुकता आहे, तशी साऊथच्या प्रेक्षकांना देखील याची उत्सुकता आहे. नुकतेच नागार्जुनचा मुलगा व साऊथचा मोठा स्टार नागा चैतन्य याने अमिर खान याच्या लाल सिंग चढ्ढा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. पण, अमिर खानचा हा चित्रपट फ्लॉप ठरला त्यामुळे नागा चैतन्यची बॉलिवूडमधील एन्ट्री देखिल फ्लॉपच ठरली असे म्हणावे लागेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

साऊथमध्ये ब्रह्मास्त्रचे प्रमोशन बाहुबली आणि आरआरचे दिग्दर्शक राजामौली आणि अभिनेता ज्युनिअर एनटीआर हे करत आहेत. याचा चांगला प्रभाव पडत असून ब्रह्मास्त्रला साऊथ मधून चांगले ॲडव्हान्स बुकींग मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटाची क्रेझ केवळ हिंदीच नाही तर दक्षिणेतही पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या तेलगू आवृत्तीने तब्बल 6.57 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

ब्रह्मास्त्रचे साऊथमधील बुकींग

बेंगळुरू – 19.54 लाख, हैदराबाद 49.6 लाख, चेन्नई – 10.08 लाख

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

Back to top button