नवा गडी नवं राज्य : कर्णिक निघाले लालबागच्या राजाच्या दर्शनाला | पुढारी

नवा गडी नवं राज्य : कर्णिक निघाले लालबागच्या राजाच्या दर्शनाला

पुढारी ऑनलाईन डेस्क : “नवा गडी नवं राज्य” ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. आतापर्यंतच्या भागात आपण पाहिले की, कर्णिकांच्या घरी गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा झाला. त्यामुळे रमासहित सर्व मंडळी फारच खुश आहेत. चिंगीला तिच्या मित्रमैत्रिणी सोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला जायचे आहे आणि आनंदीचीदेखील तशी इच्छा आहे. राघव दोघींची इच्छा पूर्ण करण्यासाठी लालबाग राजाच्या दर्शनाला घेऊन जातो, हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

या भागाच्या चित्रीकरणावेळचे अनुभव सांगताना मालिकेचा लेखक प्रह्लाद कुडतरकर म्हणतो-“लालबागच्या राजाचा विजय असो..” ही घोषणा करत, ऐकत गिरणगावात बालपण गेलं. राजाचा आशीर्वाद कायम पाठीशी असायचा. तोच आताही आहे. त्यामुळेच लालबागच्या राजाच्या इथे मालिकेचं शूटींग ही गोष्ट कुणालाही सांगितल्यावर अशक्य वाटली. अर्थातच भाविकांची राजाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी. त्याची सगळ्यांना असणारी ओढ. यामुळे सगळ्यांना असं वाटून गेलं. पण लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने “नवा गडी नवं राज्य” या मालिकेचं चित्रीकरण झालं. त्यामागे अर्थातच सगळ्या टीमची मेहनत आहे.”

Back to top button