Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

Amitabh Bachchan
Amitabh Bachchan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचे शहेनशहा अभिनेते अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झालीय. (Amitabh Bachchan) स्वत: बिग बींनी सोशल मीडियावर चाहत्यांना ही माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीमुळे त्यांचे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत. मात्र, अमिताभ बच्चन यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे की नाही हे अद्याप सांगितलेले नाही. अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती -१४' हा क्विझ शो होस्ट करत आहेत. (Amitabh Bachchan)

अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. खुद्द बिग बींनी सोशल मीडियावर चाहत्यांना ही माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर लिहिले की, "काही वेळापूर्वीच मी कोरोना पॉझिटिव्ह आलो आहे. माझ्या संपर्कात आलेले कोणीही, कृपया स्वतःची चाचणी करून घ्या."

अमिताभ यांना कोरोना

या गेम शोदरम्यान अमिताभ बच्चन अनेक स्पर्धकांच्या संपर्कात येतात. अशा परिस्थितीत त्यांना संसर्ग कसा झाला, हे सांगणे कठीण आहे. अमिताभ बच्चन स्वतःला फिट ठेवण्यासाठी अनेक गोष्टी करत असतात. कोरोनाच्या काळातही ते स्वतःची खूप काळजी घेत होते. 'KBC १४' च्या सेटवर अमिताभ बच्चनदेखील खूप काळजी घेत होते. पण, त्यांना कोरोनाची लागण झाली.

दरम्यान, अमिताभ बच्चन सध्या इतर अनेक प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहेत. ते अलीकडेच अजय देवगणचा चित्रपट 'रनवे-३४' चित्रपटात दिसले होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. यानंतर ते अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

कुटुंबातील कोणालाही याची लागण झाली नसली तरी रविवारी एकूण ३१ कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला आहे. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये ही माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले की, मी देशांतर्गत कोविड परिस्थितीचा सामना करत आहे. मी तुमच्याशी नंतर कनेक्ट करेन. आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाचा फटका बसला आहे. यामध्ये करीना कपूर खान, मृणाल ठाकूर, एकता कपूर, अमृता अरोरा, अर्जुन कपूर आणि इतर सेलिब्रिटी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news