Krushna Abhishek : कृष्णा अभिषेकने का सोडला कपिल शर्मा शो?

Krishna-Abhishek
Krishna-Abhishek

पुढारी ऑनलाईन डेस्क : सपनाची भूमिका करून कॉमेडियन कृष्णा अभिषेकने आपले नाव कपिल शर्मा शोमध्ये कमावले. कृष्णा स्वत: मानतो की, सपनाच्या भूमिकेने त्याला एक वेगळी ओळख मिळालीय; पण कृष्णाने द कपिल शर्मा शो सोडल्याचे वृत्त समोर येत आहे.  (Krushna Abhishek) कृष्णा अभिषेक द कपिल शर्मा शोमध्ये सहभागी नसल्याने हे वृत्त समोर आले. असे वृत्त आहे की, कपिल शर्मा शो सप्टेंबरपासून टीव्ही स्क्रीन्सवर पुन्हा येत आहे. यात  कृष्णा अभिषेक दिसणार नाही. कृष्णा अभिषेकविषयी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अखेर कृष्णाने स्वत: यामागील कारण सांगितलं आहे. (Krushna Abhishek)

शोमध्ये दिसणार नाही 'सपनाचे पार्लर'

सपनाची व्यक्तीरेखा कृष्णाचे फॅन्सना आठवणार आहे. कृष्णा अभिषेक आपल्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जातो. तो या शोतून बाहेर पडला खरा. पण, स्वत: तो या शोला खूप मिस करेल. रिपोर्टनुसार, "शोचे निर्माते आणि कृष्णाने खूप प्रयत्न केला की, सर्वकाही ठीक होईल; पण सर्वात मोठा विषय होता मानधनाचा. शोचे निर्माते आणि त्याच्यामध्ये पैशांचा विषय होता. त्यामुळे त्याला शोतून बाहेर पडावं लागलं. "

दरम्यान, ही देखील अफवा होती की, कृष्णा शो सोडणार होता, याच गोष्टीवरून कृष्णा अभिषेक आणि कपिल शर्मा यांच्यामध्ये मतभेद झाले. या गोष्टीवरून पण, एका सूत्रानुसार, "हे खूपचं वायफळ गोष्ट आहे. कपिल या शोचा निर्माता नाहीये. त्याला स्वत:चे मानधन मिळते. त्यामुळे किपल आणि कृष्णा यांच्यातील पैशांवरून झालेले मतभेद बिनबुडाचे आहेत. कपिल आणि कृष्णा एकमेकांचा खूप आदर करतात."

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news