भन्साळींच्या हीरामंडी वेबसीरिजमध्ये दिसणार १८ अभिनेत्री | पुढारी

भन्साळींच्या हीरामंडी वेबसीरिजमध्ये दिसणार १८ अभिनेत्री

मुंबई; पुढारी ऑनलाईन : निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’ या वेबसीरिजची गेल्या काही काळापासून खूप चर्चा आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्रींची मोठीच मांदियाळी असणार आहे.

८ भागांच्या या सीरिजमध्ये जवळपास १८ अभिनेत्री या सीरिजमध्ये काम करत असल्याची माहिती आहे. त्यामध्ये सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी या असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे.

तर इतर अभिनेत्रींमध्ये मनीषा कोईराला, संजिदा शेख, निम्रत कौर, जुही चावला, डायना पेंटी यादेखील दिसणार आहेत. जुही चावला यात ‘कॅमियो’ करणार आहे. तर उर्वरित सर्व अभिनेत्रींच्या भूमिका मोठ्या असणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, या सीरिजची कहाणी १९ व्या शतकापासून ते फाळणीपर्यंतचा पट उलगडणार आहे. हीरामंडी हे ठिकाण लाहोर येथे होते. त्याला शाही मोहल्ला असेही म्हटले जात होते.

फाळणीनंतर येथील तवायफ यांचा एक जत्था मुंबईत आला. मुंबईत येऊन त्या गायिका आणि डान्सर झाल्या.

कोठ्यांमधील गीत-संगीत, संगीतावर प्रेम करणारे, रियाज, संगीतातील दोन घराण्यांतील टक्कर, इंग्रजांच्या सैन्यातील भारतीय सैनिकांचा लव्ह अँगल, याशिवाय त्या काळातील प्रसिद्ध कवीदेखील यात दिसणार आहेत.

आठपैकी पहिले तीन आणि शेवटचा एक असे चार एपिसोडस् संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करणार आहेत. उर्वरित एपिसोडस्चे दिग्दर्शन भन्साळींचे सहकारी विभू पुरी आणि मिताक्षरा कुमार करतील.

Back to top button