Box Office Collection : अक्षयची फ्लॉपच्या दिशेने वाटचाल; आमिर खानची अवस्था बिकट, बॉक्स ऑफिसवर ‘साऊथ’चा दबदबा | पुढारी

Box Office Collection : अक्षयची फ्लॉपच्या दिशेने वाटचाल; आमिर खानची अवस्था बिकट, बॉक्स ऑफिसवर ‘साऊथ’चा दबदबा

पुढारी ऑनलाईन डेस्क : Box Office Collection : सध्या आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर हवा गुल झाल्याचे चित्र आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘रक्षा बंधन’ यांना रिलीज होण्यापूर्वीच विरोध होत होता, ज्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसत आहे. साऊथच्या छोट्या बजेटच्या चित्रपटांसमोर आमिर आणि अक्षयचे दोन्ही चित्रपट कमाईच्या बाबतीत अपयशी ठरले आहेत. वीकेंड आणि सरकारी सुट्ट्यांचा माहोल असूनही बॉलिवूडच्या या दोन्ही चित्रपटांची कमाईच्या बाबतीत दिवसेंदिवस पिछेहाट होत आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या चित्रपटाने मंगळवारी बॉक्स ऑफिसवर कमाई केली.

लाल सिंह चड्ढा

लालसिंग चड्ढा

आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ रिलीजपूर्वी पासूनच बहिष्काराच्या मागणीमुळे चर्चेत होता, त्यामुळे आता या चित्रपटाच्या खराब प्रदर्शनामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर आमिरच्या पुनरागमनाचा कोणताही परिणाम झालेला नाही आणि चित्रपटाची अवस्था बिकट आहे. 180 कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाचे कलेक्शन दिवसेंदिवस कमी होत आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने मंगळवारी केवळ 2.50 कोटींचा व्यवसाय केला. अशा परिस्थितीत सहा दिवसांनंतरही चित्रपटाची कमाई 50 कोटींचा टप्पा पार करू शकलेली नाही. ती 48.33 कोटी एवढीच झाली आहे. (Box Office Collection)

रक्षा बंधन

रक्षाबंधन

अक्षय कुमार ‘रक्षाबंधन’मधून वर्षात तिसऱ्यांदा मोठ्या पडद्यावर अवतरला. हा चित्रपट त्याच्या पहिल्या दोन चित्रपटांसारखाच असेल अशी अपेक्षा होती. मात्र तसे काही झाले नाही. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या कमततरतेसह आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. रक्षाबंधनची बॉक्स ऑफिसवरील कमाईही काही विशेष नाहीये. आकडेवारीनुसार, मंगळवारी चित्रपटाने 2.10 कोटींची कमाई केली आहे, तर सोमवारी चित्रपटाने 6.31 कोटींची कमाई केली. सहा दिवसांनंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 36.57 कोटी रुपये झाले आहे.

कार्तिकेय 2

कार्तिकेय 2

चंदू मोंडेटी दिग्दर्शित ‘कार्तिकेय 2’ रिलीज झाल्यापासून आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ला टक्कर देत आहे. सुपरस्टार निखिल सिद्धार्थचा ‘कार्तिकेय 2’ हा चित्रपट तेलुगुसोबतच हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आकडेवारीनुसार, या चित्रपटाने 3.50 कोटींचा व्यवसाय केला आहे, जो आमिरच्या चित्रपटापेक्षा जास्त आहे. 30 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चौथ्या दिवशी 21.62 कोटींची कमाई केली आहे.

फिल्म विरुमन

विरुमन

एम. मुथय्या दिग्दर्शित आणि लिखित, ‘विरुमन’ रिलीज झाल्यापासून अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’ला टक्कर देत आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये दररोज बॉक्स ऑफिसवर टक्कर होत असते. कार्ती स्टारर ‘विरुमन’ने पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 2 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्याचवेळी, आता चित्रपटाची एकूण कमाई 36.57 कोटींवर गेली आहे. या चित्रपटात कार्तीशिवाय आदिती शंकर, प्रकाश राज, सुरी मुथुचामी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

गालीपता 2

गालीपता 2

योगराज भट दिग्दर्शित ‘गलीपता 2’च्या कलेक्शनमध्ये मंगळवारी घट झाली. पहिल्या दिवसापासून जिथे चित्रपटाची कमाई दररोज वाढत होती, तिथे मंगळवारी घट झाली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3.05 कोटी, दुसऱ्या दिवशी 4.3 कोटी, तिसऱ्या दिवशी 5.65 कोटी आणि चौथ्या दिवशी 5.50 कोटींची कमाई केली. आकडेवारीनुसार, चित्रपटाने मंगळवारी म्हणजेच पाचव्या दिवशी 1.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. अशा प्रकारे चित्रपटाची एकूण कमाई 20.21 कोटींवर गेली आहे.

नन ठान केस कोदू

नन ठान केस कोदू

रतिन बाला कृष्णन दिग्दर्शित नन ठान केस कोदू या चित्रपटाच्या कमाईतही घट झाली आहे. कुंचको बोबन स्टारर ‘नन ठान केस कोदू’ने रविवारी 2 कोटी, सोमवारी 1.77 कोटी कमावले आहेत, त्यानंतर मंगळवारी त्याची कमाई कमी झाली. आकडेवारीनुसार, चित्रपटाने मंगळवारी केवळ 55 लाखांची कमाई केली. अशा परिस्थितीत चित्रपटाची एकूण कमाई आता 8.52 कोटींवर गेली आहे.

सीता रामम

सीता रामम

दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूर यांच्या पॅन इंडिया चित्रपटाने आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’लाही मागे टाकले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दुसरा आठवडा सुरू आहे, मात्र तरीही तो प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहे. 30 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे. आकडेवारीनुसार म्हणजेच 12 व्या दिवशी चित्रपटाने 70 लाखांची कमाई केली. अशा परिस्थितीत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 36.65 कोटींवर गेले आहे.

बिम्बिसार

बिंबिसार

40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या कल्याण रामच्या ‘बिंबिसार’ चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून 12 व्या दिवशी 40.60 कोटींचा व्यवसाय केला आहे. बॉक्स ऑफिसवरील ही कमाई ‘सीता रामम’ चित्रपटाच्या बरोबरीची आहे. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुरुवातीपासूनच टक्कर देत आहेत.

Back to top button