बीड; पुढारी वृत्तसेवा : अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या विनायकराव मेटे यांना सामाजिक प्रश्नांची मोठी जाण होती. अलीकडच्या काळात तरूणाई व्यसनाधीन बनल्याने विनायक मेटे यांनी व्यसनमुक्त महाराष्ट्र चळवळ उभारली. त्यांच्या निधनाने ही चळवळ पोरकी झाली असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
मेटे यांनी सामुदायिक विवाह सोहळे घेऊन गोरगरिबांच्या मुला-मुलींचे विवाह पार पाडण्याची चळवळ उभी केली होती. तसेच कोरोना महामारी काळातील दोन वर्षांचा अपवाद वगळता ते बीड येथे प्रत्येक वर्षी 31 डीसेंबर रोजी व्यसनमुक्तीचा भव्य कार्यक्रम घेत असत. या कार्यक्रमाला सुमारे 50 हजार लोक उपस्थित असायचे. थर्टीफस्ट दारू पिऊन नव्हे तर दुध पिऊन साजरा करा, असे ते म्हणायचे. शिवाय या कार्यक्रमाला उपस्थितांना मसाला दुधाचे वाटप करायचे. विशेष म्हणजे व्यसनमुक्तीसाठी काम करणार्या अनेकांचा त्यांनी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवही केला. सतत सामाजिक कार्य करणार्या मेटेंचा अपघाती मृत्यू झाल्याने व्यसनमुक्तीची चळवळ पोरकी झाली आहे.
हेही वाचा :