Nayanthara Vignesh Shivan
Nayanthara Vignesh Shivan

Nayanthara Honeymoon diary : नयनतारा-विग्नेश बार्सिलोना व्हेकेशनवर

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक विग्नेश शिवनने शुक्रवारी घोषणा केली की, त्याची पत्नी अभिनेत्री नयनतारा (Nayanthara Honeymoon diary) आणि तो स्पेनमधील (Nayanthara Honeymoon diary) बार्सिलोनामध्ये सुट्ट्या एन्जॉय करायला जात आहेत. त्याने इन्स्टाग्रामवर विमानाच्या आतून फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये दोघांचे फोटो पाहायला मिळत आहेत. विघ्नेश शिवनने लिहिले, "काम, काम, कामाच्या अथक परिश्रमानंतर, आम्ही येथे काही वेळ स्वतःसाठी घालवायला जातो! बार्सिलोना आम्ही येत आहोत!"

त्याने दुसर्‍या फोटोसह पोस्ट लिहिली, "बार्सिलोनाच्या वाटेवर त्याच्या पत्नीसह!"

दिग्दर्शक विग्नेश गेल्या काही आठवड्यांपासून कठोर परिश्रम घेत आहेत. आता तो सेलिब्रेशन करण्याच्या मूडमध्ये आहे.

नयनताराचा पती विग्नेश चेन्नईमध्ये आयोजित बुद्धिबळ ओलंपियाडचे उद्घाटन आणि समारोप समारंभाचे आयोजन करणाऱ्या टीमचा एक भाग होता. मागील काही आठवड्यांपासून तो प्रचंड मेहनत घेत आहे. ही स्पर्धा यशस्वी ठरल्याने त्याचे कौतुक होत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनीदेखील विग्नेशच्या नावाचा उल्लेख करत कौतुक केलं होतं.

मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या नावाचा संदर्भ देताना, त्याने इन्स्टाग्रामवर म्हटले होते, "आयुष्यातील अविस्मरणीय क्षण जेव्हा माननीय मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी माझ्या नावाचा उल्लेख दयाळू आणि उत्साहवर्धक शब्दात केला! त्यांची नम्रता आणि उदारता दर्शवते. माझी आई आणि बहीण तेथे आहेत आणि माझी पत्नी टीव्हीवर पाहत आहे आणि कुटुंबातील सदस्य आणि माझे मित्र यावेळी खूप आनंदी आणि अभिमान वाटत आहेत. धन्यवाद सर. या एका गोड क्षणासाठी सर्व मेहनत सार्थकी लागली."

हेदेखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news