मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात निदर्शने; संजय पवार, विजय देवणे, रवी इंगवलेसह २० जण ताब्यात | पुढारी

मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात निदर्शने; संजय पवार, विजय देवणे, रवी इंगवलेसह २० जण ताब्यात

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, रवी इंगवले यांच्यासह 20 जणांना शनिवार दुपारी ताब्यात घेण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात नुकतेच शपथविधी झालेल्या संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी नियोजित बैठक आहे. जिल्ह्यातील पूरस्थिती आणि जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नावर या बैठकीत चर्चा होणार आहे. या काळात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन्ही मंत्र्यांच्या राजीनामाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येणार होते.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शाहूपुरी, लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा पोलिसांनी प्रमुख पदाधिकाऱ्यासह 20 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने संजय पवार, विजय देवणे, रवी इंगवले, हर्षल सुर्वे, रंजीत आयरेकर यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button