Yukti Kapoor : 'मॅडम सर'मध्‍ये युक्‍ती कपूर दुहेरी भूमिकेत | पुढारी

Yukti Kapoor : 'मॅडम सर'मध्‍ये युक्‍ती कपूर दुहेरी भूमिकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी सबवरील सुपर कॉप मालिका ‘मॅडम सर’ लक्षवेधक कथानक, अविरत ड्रामा आणि प्रत्‍येक एपिसोडमधील अंतर्गत नोक-झोकसह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. (Yukti Kapoor) आपल्‍या आवडत्‍या महिला पोलिस अधिकारी केसेसचे निराकरण करण्‍यामध्‍ये व्‍यस्‍त असताना मालिका नवीन पात्राच्‍या रूपात नवीन ट्विस्‍ट घेऊन येण्‍यास सज्‍ज आहे, पण ती पोलिस नाही. (Yukti Kapoor)

अद्वितीय, ड्रामाने भरलेली आणि करिष्‍मासारखी हुबेहूब दिसणारी ती करिष्‍माची जुळी बहीण करीना आहे.
आपल्‍या एस. जे. करिष्‍मा सिंगच्‍या पूर्णत: विरूद्ध असलेली करीना महिला पोलिस ठाण्यामध्ये नवीन वादळ घेऊन येणार आहे.

करिष्‍मा व करीनाची भूमिका साकारत युक्‍ती कपूर पहिल्‍यांदाच दुहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे. करिष्‍मापेक्षा एका मिनिटाने लहान असलेली तिची ही जुळी बहीण उत्तम नर्तिका आहे, पण ती तिच्‍या अभिनय कौशल्‍यांमध्‍ये काहीशी कमकुवत असली तरी तिची इंडस्‍ट्रीमध्‍ये सर्वात मोठी अभिनेत्री बनण्‍याची महत्त्वाकांक्षा आहे. तिच्‍यासाठी समोरून कॅमेरा कधीच दूर जात नाही, इतका ती मेक-अपशिवाय तिचा चेहरा कधीच दाखवत नाही. ती तिच्‍या लुक्‍सबाबत खूप जागरूक आहे आणि फक्‍त तिचा सर्वोत्तम प्रोफाइल दाखवणे पसंत करते. तिच्‍या सर्व कृत्‍यांचा परिणाम तिच्‍या बहिणीला सहन करावा लागतो, ज्‍यामुळे करिष्‍मा तिच्‍यावर रागावते.

करिष्‍माच्‍या कामाच्‍या ठिकाणी जुळ्या बहिणी एकत्र भेटल्‍यानंतर सर्वकाही सुरळीत असेल का? महिला पोलिस ठाण्यात आपल्‍या बहिणीच्‍या आकस्मिक उपस्थितीबाबत करिष्‍माची प्रतिक्रिया काय असेल?

नवीन भूमिकेबाबत सांगताना युक्‍ती कपूर म्‍हणाली, ”करीना ही प्रेक्षक दीर्घकाळापासून पाहत आलेल्‍या करिष्‍माच्‍या पूर्णत: विरूद्ध आहे. तिच्‍या मनात प्रसिद्ध होण्‍याची इच्‍छा आहे. ती वास्‍तविक विश्‍व फिल्‍म-सेट असल्‍याप्रमाणे नखरे करते आणि ऑर्डर्स देते. विशेषत: एकाच वेळी साकारत असलेल्‍या पोलिस भूमिकेपेक्षा ही वेगळी भूमिका असल्‍याने साकारण्‍यासाठी खूप धमाल आहे. पोलिसची भूमिका तिच्‍या कामाप्रती गंभीर आहे आणि तिच्‍याकडे जीवनात इतर कोणत्‍याही गोष्‍टीसाठी वेळ नाही. दुहेरी भूमिका साकारण्‍याची संधी अत्‍यंत उत्‍साहवर्धक आहे आणि मी दोन्‍ही भूमिकांमधील विरोधाभासाचा आनंद घेत आहे. मला खात्री आहे की, आगामी एपिसोड्समध्‍ये ते पाहणे अत्‍यंत मनोरंजनपूर्ण असणार आहे.”

Back to top button