बिग बॉस ओटीटी : शमिता शेट्टी-राकेश बापट यांच्या 'त्या' किसची जोरदार चर्चा | पुढारी

बिग बॉस ओटीटी : शमिता शेट्टी-राकेश बापट यांच्या 'त्या' किसची जोरदार चर्चा

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस ओटीटी या शोमध्ये शमिता शेट्टी-राकेश बापट यांच्या त्या किसची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. शमिता शेट्टी-राकेश बापट यांची लव्ह स्टोरीला सुरुवात झाली आहे.

अधिक वाचा-

काबूल विमानतळ : पानी ३ हजार रुपये लीटर, साडेसात हजार रुपयांना राईस प्‍लेट 

‘वर्क फ्रॉम होम’मुळे ‘ड’ जीवनसत्त्व ची कमतरता?

बिग बॉस ओटीटी तिसऱ्या आठवड्यात पोहोचला आहे. घरात प्रत्येकाचं कनेक्शन बदलताना दिसत आहे. प्रतीक सहजपाल आणि नेहा भसीनने आपल्या पार्टनरची सोबत सोडून एकमेकांचा हात धरला आहे. तर अक्षरा सिंह आणि मिलिंद गाबा यांची पण एक नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

अधिक वाचा-

नारायण राणे यांना गृहमंत्री अमित शहा यांचा फोन…

चिकुनगुनिया व होमिओपॅथिक उपचार

निशांतपासून ते जीशानपर्यंत अनेक लोकांनी आपलं कनेक्शन बदललं आहे. परंतु, या सर्व परिस्थितीत एक जोडी अशी आहे की, त्यांनी प्रत्येक जी प्रत्येक आव्हानात एकमेकांसोबत आहे. ती जोडी आहे -शमिता आणि राकेशची.

अधिक वाचा-

रकुल प्रीत, भल्लाळदेव ड्रग्ज प्रकरणात अडचणीत; ईडीने बजावली नोटीस 

उसाच्या एफआरपीत प्रतिटन ५० रुपये वाढ

shamita shetty
शमिता शेट्टी

स्ट्राँग कंटेस्टेंटचा अभाव

शमिताने राज कुंद्रा प्रकरणानंतर बिग बॉस ओटीटीत पाऊल ठेवलं. तेव्हा लोकांना हे अजिबात आवडलं नव्हतं. त्यांना पुन्हा शोमद्ये आणण्याच्या प्रकारावरून निर्माते ट्रोलदेखील झाले होते.

पण, कुणाकडेच लक्ष न देता शमिता शेट्टीने एंट्री केली. राकेश बापटसोबत तिचं एक मजबूत कनेक्शन तयार झालं. वेळोवेळी ते एकमेकांसोबत उभे राहिले.

shamita shetty
शमिता शेट्टी आणि राकेश बापट

राकेश बापटशी जवळीक

शमिता-राकेश सुरवातीपासूनचं एकत्र गेम पुढे नेत आहेत. या गेमसोबत त्यांची जवळीकताही पाहायला मिळतेय. राकेश बापट काही दिवसांपूर्वी शमिताशी फ्लर्ट करताना दिसले होते. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.

शमिता शेट्टीच्या हातावर केलं किस

राकेश आणि शमिता यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये शमिता झोपलेली दिसते. सकाळी-सकाळी राकेशन शमिता शेट्टीच्या हाताला एक किस दिला. या प्रकाराचा एक फोटो व्हायरल झाला. शमिता आणि राकेश यांच्या मैत्रीवर लोक कमेंटचा वर्षाव करत आहेत.

हेदेखील वाचा- 

मौनी रॉय : तुझा झगा गं वाऱ्यावर उडतो कसा… 

World Women’s Equality Day : रणरागिणी मी, कर्तव्यपूर्तीशी जोडले आता नाते 

कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ प्रश्नी तातडीची बैठक घ्यावी : क्षीरसागर  

पाहा व्हिडिओ- ट्रेकर्सचा स्वर्ग हरिश्चंद्रगड कोकणकडा | The beauty of Harishchandragad 

Back to top button