Amitabh Bachchan childhood story : जेव्‍हा अमिताभ बच्‍चन यांनी बंगल्‍यातील ‘रहस्‍य’ जाणण्‍यासाठी चोरले होते पैसे, आईचा खा्‍ल्‍ला होता मार …. | पुढारी

Amitabh Bachchan childhood story : जेव्‍हा अमिताभ बच्‍चन यांनी बंगल्‍यातील 'रहस्‍य' जाणण्‍यासाठी चोरले होते पैसे, आईचा खा्‍ल्‍ला होता मार ....

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्‍चन हे एक असे व्‍यक्‍तिमत्त्‍व आहे की, त्‍यांचे चाहते दररोज
त्‍यांच्‍याविषयी नवी माहिती जाणून घेण्‍यासाठी उत्‍सुक असतात. मग, ही माहिती त्‍यांच्‍या चित्रपटांविषयी असो की व्‍यक्‍तिगत आयुष्‍यातील. आजवर या महानायकावर अनेक पुस्‍तकं लिहिली गेली आहे. मात्र पुष्‍पा भारती यांच्‍या ‘अमिताभ बच्‍चन जीवन गाथा’ पुस्‍तकामध्‍ये अमिताभ बच्‍चन यांच्‍याविषयी अनेक रंजन गोष्‍टींची माहिती देण्‍यात आली आहे. याच पुस्‍तकात अमिताभ यांनी आपल्‍या बालपणाच्‍या अनेक गोष्‍टींवर प्रकाशझोत टाकला आहे. ( Amitabh Bachchan childhood story  )

Amitabh Bachchan childhood story : काय आहे किस्‍सा…

अमिताभ बच्‍चन यांच्‍या बालपणातील एक आठवण पुष्‍पा भारत यांच्‍या ‘अमिताभ बच्‍चन जीवन गाथा’ या पुस्‍तकात वाचायला मिळते. ती अशी आहे की, बालपणी अमिताभ हे अलाहाबाद ( आताचे प्रयागराज ) मधील क्‍लाइव रोडवरील एका बंगलात राहत होते. या बंगल्‍यासमोर एक मोठा वाडा होता. यावेळी चर्चा असल्‍याची की, या वाड्यात एक म्‍हातारी राणी राहते. ‘रानी बेतिया की कोठी’ असे या वाड्याचे नावच होते. या वाड्याभोवती उंची दरवाजे होते. वाड्यात जाण्‍याला कोणालाही परवानगी नव्‍हती.

या राणीला कोणी पाहिले नव्‍हतं. अमिताभ यांना या सर्व गोष्‍टीचे खूपच कुतहल वाटलं. वाड्यात नेमंक कोणते रहस्‍य दडले आहे. हे जाणून घेण्‍याचा अमिताभ यांनी निर्धार केला. यासाठी काहीही करुन वाड्यात जायचेच, असे त्‍यांनी ठरवले.

चारआणे दे तुला गेटच्‍या आत सोडतो…

अमिताभ यांनी त्‍या वाड्यात खूप वेळा आत जाण्‍याचा प्रयत्‍न केला. या वाड्याच्‍या बाहेर अनेक चौकीदारही असत. एक दिवस त्‍यांना चौकदार म्‍हणाला की “तुला वाड्यात आत जायचे असेल तर चारआणे घेवून ये”.

आईचा बसला मार, रहस्‍य पाहण्‍याचे स्‍वप्‍नही राहिले अधुरे

चौकीदाराला चारआणे देण्‍यासाठी अमिताभ यांना आपल्‍या आईच्‍या ड्रेसिंग टेबलची आठवण झाली. या ड्रेसिंग टेबलवर एक डब्‍बा ठेवलेला असायचा. या डब्‍बात त्‍यांची आई बांगड्यांसह सौदर्यप्रसाधने ठेवत असे. तसेच यात काही पैसेही असत. अमिताभ यांनी या डब्‍यातून चारआणे चोरले. ते पैसे चौकीदाराला दिले. तरीही त्‍याने वाडा पाहण्‍यासाठी आत सोडलेच नाही. वाड्यातील रहस्‍य जाणून घेणे राहिलेच उलट पैसे चोरल्‍याची आईला समजले. अमिताभ यांना चोरीच्‍या कृत्‍याला बद्‍दल चांगला मारही बसला, अशी आठवण पुष्‍पा भारती यांच्‍या ‘अमिताभ बच्‍चन जीवन गाथा’ पुस्‍तकात नमूद केली आहे.

हेही वाचा :

 

 

 

Back to top button