shreyas talpade : श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत

shreyas talpade
shreyas talpade

पुढारी ऑनलाईन डेस्क : माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून मराठी अभिनेता श्रेयस तळपदेने सर्वांच्याच मनावर रुंजी घातली. अभिनेत्री प्रार्थना बेहरेसह तो स्क्रीन शेअर करताना दिसला. बॉलीवूड अभिनेतादेखील असणारा श्रेयस तळपदे (shreyas talpade) पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसेल. कंगना रानौतच्या इमरजन्सी चित्रपटामध्ये श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारणार आहे. (shreyas talpade)

श्रेयसचे नाव अशा स्टार्सच्या यादीत समाविष्ट आहे जे त्यांच्या अभिनयासोबतच कॉमिक टायमिंगसाठी ओळखले जातात. श्रेयसने आपल्या कॉमेडीने लाखो-करोडो लोकांना वेड लावले आहे. तो 'कौन प्रवीण तांबे' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे क्रिकेटपटू प्रवीण तांबेची भूमिका साकारलीय.

त्याचबरोबर कंगना एका नव्या रूपात दिसेल. इमरजन्सी (Emergency) मध्ये ती दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारताना दिसेल. आता हा चित्रपट कधी रिलीज होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक यूट्यूबवर लॉन्च करण्यात आलाय. हा चित्रपट इंदिरा गांधी यांच्याद्वारे भारतात लावण्यात आलेल्या आणीबाणीवर आधारित असेल.

कंगनाचा इमरजन्सी चित्रपट २५ जून, २०२३ रोजी रिलीज करण्यात येईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news