मायकल जॅक्सन यांच्या भुताबरोबर लग्‍न केल्याचा ‘तिचा’ दावा! | पुढारी

मायकल जॅक्सन यांच्या भुताबरोबर लग्‍न केल्याचा ‘तिचा’ दावा!

वॉशिंग्टन : काही तरी भन्‍नाट दावे करून जगाचे लक्ष आपल्याकडे वळवून घेणार्‍या महाभागांची अजिबात कमतरता नाही. आता एका अमेरिकन महिलेने आपण दिवंगत पॉपसम्राट मायकल जॅक्सन च्या भुताशी लग्‍न केल्याचा दावा केला आहे. मायकलचे भूत आपल्याला झपाटते असेही तिने म्हटले आहे.

कॅथलिन रॉबर्टस् असे या महिलेचे नाव आहे. तिने म्हटले आहे की ज्या ज्या वेळी ती वॉशरूममध्ये जाते त्यावेळी मायकलचे भूत तिला झपाटते आणि नाचगाणे सुरू करते! तिने सांगितले, मायकल जॅक्सन नेहमी माझ्या शरीरात राहतो आणि आमच्यामधील या खास ‘बाँडिंग मोमेंटस्’ना ‘टॉयलेटरीज’ म्हणतो! तो माझ्याशी बरेच बोलत असतो.

माझ्याकडून तो स्वतःच्या आवडीचे खाद्यपदार्थही बनवून घेतो आणि अतिशय चवीने खातो. प्रत्येक नात्यात काही उतार-चढाव असतात; पण आमचे एकमेकांवर प्रेम आहे हे तितकेच खरे! कॅथलिनच्या या दाव्याने इंटरनेटवर खळबळ माजली आहे. अनेक यूजर्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Back to top button