Actor David Warner : 'टायटॅनिक'मधील अभिनेते डेव्‍हिड वॉर्नर यांचे निधन | पुढारी

Actor David Warner : 'टायटॅनिक'मधील अभिनेते डेव्‍हिड वॉर्नर यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘टायटॅनिक’ आणि ‘द ओमान’ यासारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसलेले लोकप्रिय अभिनेते डेव्‍हिड वॉर्नर यांचे कॅन्सरने (Actor David Warner ) निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. डेव्हिड वॉर्नर शेवटचे लंडनमधील निवृत्तीगृहात राहत होते. (Actor David Warner )

‘टायटॅनिक’ आणि ‘द ओमान’ सारख्या अनेक चित्रपटांचा भाग असलेले लोकप्रिय अभिनेते डेव्हिड वॉर्नर मागील काही दिवस कॅन्सरशी झुंज देत होते. डेव्हिड वॉर्नरने ‘टायटॅनिक’मध्ये दुष्ट सेवक स्पायसर लवजॉयची भूमिका साकारली होती.

वॉर्नरच्या कुटुंबीयांनी एका निवेदनात म्हटले आहे की,  डेव्हिड वॉर्नर हे अतिशय दयाळू आणि नम्र स्वभावाचे हाेते. त्यांच्‍या जाण्याने कुटुंब दुभंगले आहे.  त्‍यांच्‍या निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ते नेहमीच आमच्‍या स्‍मरणात राहतील.

 

डेव्हिड वॉर्नर यांची दोन लग्न झाली होते. त्यांच्या पश्चात पत्नी लिसा, मुलगा ल्यूक आणि सून, पहिली पत्नी हॅरिएट इव्हान्स असा परिवार आहे. डेव्हिड वॉर्नर बहुताांश चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसले. १९४१ मध्ये मँचेस्टरमध्ये जन्मलेल्या डेव्हिड वॉर्नर यांनी ‘लिटिल माल्कम’, ‘ट्रॉन’, ‘टाईम बॅंडिट्स’, ‘स्टार ट्रेक’ आणि ‘द फ्रेंच लिटिल वुमन’ यासह अनेक चित्रपट केले. ते ७० आणि ८० च्या दशकातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक होते.

डेव्हिड वॉर्नर यांनी रॉयल शेक्सपियर कंपनीसोबत खूप काम केले होते. किंग हेनरी VI और किंग रिचर्ड २ ची भूमिका साकारल्यानंतर ते स्टार झाले.  त्‍यांनी १९६५ मध्ये हॅम्‍लेटची भूमिका साकारली होती ही भूमिका खूप गाजली. १९६६ मध्ये रिलीज झालेला Morgan: A Suitable Case for Treatment या चित्रपटातील अभिनयासाठी त्‍यांना ब्रिटिश ॲकॅडमी चित्रपट ॲवॉर्डसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं. १९८१ मध्ये  वॉर्नर यांनी टीव्ही मिनी सीरीज ‘मसाडा’ साठी एमी ॲवॉर्डदेखील जिंकलं होतं.  ‘डॉक्टर हू’, ‘पेनी ड्रेडफुल’ और ‘रिपर स्ट्रीट’ यासारख्या टीव्ही शोजमध्येही ते दिसले होते.

हेही वाचा : 

Back to top button