

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. आता एका अज्ञात व्यक्तीने अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मात्र, तातडीने कारवाई करत मुंबई पोलिसांनी धमकी देणाऱ्याला अटक केली आहे. मनविंदर सिंग असे संशयित आराेपींचे नाव आहे.
विकी-कॅटरीनाला धमकावल्याप्रकरणी मनविंदर सिंह या व्यक्तीला अटक करण्यात आलीय. सोमवारी सकाळी विकी आणि कॅटरीनाला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या प्रकरणी विकी कौशलने मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, मनविंदरला धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केल्याचे वृत्त समोर आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनविंदर हा मुंबईतील स्ट्रगलिंग ॲक्टर आहे. तो सतत चित्रपटांमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न करत हाेता. सुरुवातीच्या चौकशीत मनविंदरने कॅटरीनावर एकतर्फी प्रेम असल्याचं सांगितलं आहे. मनविंदर हा लखनऊचा रहिवासी असून, त्याने कॅतरिनाला त्याच्या मीडिया अकाऊंटवर त्याची पत्नी आणि गर्लफ्रेंड असल्याचे उल्लेख केला हाेता. इतकंच नाही तर बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट बनवून तो कॅटरीनाला धमक्याही देत हाेता.
हेही वाचा :