श्रीगोंदा: आढळगाव रस्त्यावरील काळी माती हटवली | पुढारी

श्रीगोंदा: आढळगाव रस्त्यावरील काळी माती हटवली

श्रीगोंदा, पुढारी वृत्तसेवा: आढळगाव-जामखेड राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या भरावासाठी चक्क काळ्या मातीचा वापर करण्यात आला होता. ‘ पुढारी’मध्ये याबाबत वृत्त प्रकाशित होताच काळी माती हटविण्यात आली. काल ‘पुढारी’मध्ये महामार्गाच्या कामासाठी काळी माती या मथळ्याखाली छायाचित्रासह वृत्त प्रकाशित झाले होते. वृत्त प्रकाशित होताच राष्ट्रीय महामार्ग विभागाने याची दखल घेत ज्या ठिकाणी काळी माती टाकण्यात आली होती. ती तत्काळ हटविण्याचे आदेश दिले.

संबधित ठेकेदाराने ही काळी माती बाजूला करीत त्या ठिकाणी नवीन मुरूम आणून टाकला. डोकेवाडी भागातही काळ्या मातीचा वापर रस्त्याच्या भरावासाठी केला असून त्या ठिकाणची ती काढून मुरूम टाकणे गरजेचे आहे.

सोशल मीडियावर स्वागत

‘दैनिक पुढारी’ने रस्त्याच्या कामासंदर्भातील वास्तव मांडल्याने सोशल मीडियावर हे वृत्त चांगलेच चर्चिले गेले. ‘दैनिक पुढारी’ने वास्तव मांडल्याने अनेकानी धन्यवाद दिले. तसेच, या वृत्तातून सत्या बाजू मांडल्याचे अनेकांनी सांगितले आहे.

Back to top button