पुणे : 'कीर्तनात संगीत महत्वाचे की केवळ निरुपण असे वर्गीकरण करता येणार नाही. संगीतमय कीर्तनाने श्रोते तल्लीन होऊन कीर्तनकार आणि श्रोत्यांमध्ये अद्वैत साधता येते, त्यामुळेच संगीत आणि कीर्तन हे परस्पर पूरक आहेत, असे म्हटल्यास वावगे होणार नाही,' असे मत कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले. गानवर्धन संस्थेततर्फे आयोजित मुक्त संगीत चर्चासत्रात 'कीर्तनामधील संगीत' या विषयावर दुसर्या दिवशीचे पुष्प गुंफताना आफळे बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर आणि कार्यवाह रवींद्र दुर्वे उपस्थित होते.