पुढारी ऑनलाईन डेस्क : असं म्हटलं जातं की, ब्रेकअपच्या दुःखातून तुम्ही सावरत असता तोपर्यंत अरिजित सिंग चं आणखी एक गाणं येतं आणि तुम्ही परत हृदयाचे तुकडे जमवण्याच्या मागे लागता. अरिजित सिंग याच्या सॅडसाँगने तुम्ही पुन्हा-पुन्हा तुमच्या जुन्या आठवणीत वाहत जाता.
अरजितच्या प्रसिद्ध अशा सॅडसाँगमधील एक म्हणजे बड़ा पछताओगे. नोरा फतेही आणि विकी कौशल यांचा अभिनय आणि अरिजितचा आवाज यांच्या अफलातून केमिस्ट्रीने दोन वर्षांनंतर आजही हे गाणं युट्यूबवर सुसाट आहे. ५४ कोटींच्या वर व्ह्यूज या गाण्याला मिळालेले आहेत.
"I will Back In minute," म्हणते नोरा घरातून बाहेर पडते, विकीला बहुतेक तिच्या अफेअरबद्दल आधीच शंका आलेली आहे, तोही तिच्या मागून हळूच बाहेर पडतो. नोराचं अफेअर आहे, हे कळल्यानंतर विकी पुरता उद्ध्वस्त होतो, कोलमडून पडतो.
"तुझ्या शिवाय आयुष्य कसं घालवणार, कुणाला जान म्हणून हाक मारणार," असं म्हणतं विकी जुन्या आठवणी शोधत राहतो.
तिकडे नोराचा बॉयफ्रेंड तिच्या हातात विषाची बाटली देतो. विकीनं सगळं पाहिलेलं आहे; पण तो काही तक्रार न करता हे विष पिऊन टाकतो, असं हे गाणं आहे.
प्रेमभंगाचा ज्यांना झटका बसला आहे, ते वेगवेगळ्या प्रकारे या गाण्याशी रिलिट करू पाहतात.
या गाण्यात जे काही दाखवलं आहे, ते काही प्रत्यक्षात कुणाच्या आयुष्यात घडण्याची शक्यता कमीच; पण गाण्याचे बोल असे आहेत की ते मात्र अनेकांना रिलेट होणारे वाटतात.
"मला सोडून जात आहेस, ठीक आहे; पण तुला कधी तरी पश्चाताप होईल," ब्रेकअप झालेल्या अनेकांच्या मनात हे जी काही घुसळणं सुरू असते, त्यात हा विचार असतोच.
डोक्यातला हा विचार अरजितच्या सुरांतून बाहेर पडतो, आणि तुम्ही पुन्हा-पुन्हा तुमच्या जुन्या आठवणीत, खरंच कुणाचं चुकलं या विचारात वाहत जाता.
अनेक प्रेमीयुगलांशी रिलेट करू शकण्याची ही जादूच अशी गाणी सुपर हिट करते.