शनायाचा ‘बेधडक’ डबाबंद? | पुढारी

शनायाचा ‘बेधडक’ डबाबंद?

संजय कपूरची कन्या (बोनी व अनिल कपूरची पुतणी) शनाया कपूर (अर्थातच) करण जोहरच्या ‘बेधडक’ मधून बॉलीवूड पदार्पण करणार होती. तिची चुलत बहीण जान्हवी कपूरने करणच्याच ‘धडक’मधून पदार्पण केले होते, आता करण शनायाला ‘बेधडक’मधून बॉलीवूडमध्ये आणणार होता. मात्र, हा चित्रपट डबाबंद झाला असावा किंवा त्याला अनिश्‍चित काळासाठी लांबणीवर टाकले असावे असे आता म्हटले जात आहे.

मार्चमध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्याप या चित्रपटाशी संबंधित कोणतेही अपडेट पुढे आलेले नाही. अर्थातच चित्रपटाच्या भवितव्याबाबत निर्मात्यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. शनायाने आपली चुलत बहीण जान्हवीच्या ‘गुंजन सक्सेना ः द कारगिल गर्ल’ या चित्रपटाची सहायक दिग्दर्शिका म्हणून काम केले होते. त्यावेळेपासूनच तिच्या बॉलीवूड डेब्यूबाबत कयास लावणे सुरू झाले होते.

‘बेधडक’च्या घोषणेनंतर तिने सोशल मीडियात म्हटले होेते, शशांक खेतान दिग्दर्शित ‘बेधडक’बरोबर धर्मा फॅमिलीत सहभागी होण्याबद्दल मी अतिशय आभारी आहे! इंडस्ट्रीतील आपला प्रवास सुरू करण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे.

Back to top button