जोरदार अॅक्शनसाठी टायगर श्रॉफ सज्ज : गणपतचा टिझर लाँच

टायगर श्राॅफ
टायगर श्राॅफ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टायगर श्रॉफ च्या चाहत्यांना आनंदाचे कारण मिळाले आहे. कारण अभिनेता टायगरचा नव्या 'गणपत'मध्ये चित्रपटामध्ये आपला दमदार अभिनय दाखवण्याच्या तयारीत आहे. टायगर ने चित्रपटातील त्याच्या लुकची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शविवारी २१ ऑगस्ट रोजी या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. टिझरमध्ये टायगर श्रॉफ अँग्री लुकमध्ये दिसत आहे. व्हिडीओत तो त्याच्या हातात बॉक्सिंग हॅंड रॅप गुंडाळताना दिसत आहे.

'गणपत' २३ डिसेंबर २०२२ रोजी होणार रिलीज

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत टायगर श्रॉफने खुलासा केला आहे की, 'गणपत' २३ डिसेंबर २०२२ रोजी रिलीज होणार आहे. त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'उसकी हटेगी तो सबकी फटेगी, आरेला है गणपत, तैयार रहना!' टायगर श्रॉफचे चाहते तसेच सेलिब्रिटींनी देखील गणपतच्या टिझरवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. रणवीर सिंगने त्याच्या पोस्टवर 'बवाल' अशी कमेंट केली आहे.

विकास बहल 'गणपत' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती वासू भगनानीचे पूजा एंटरटेनमेंट करत आहे. टायगर श्रॉफ या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सॅननसोबत दिसणार आहे. 'हिरोपंती' नंतर टायगर आणि क्रितीचा हा दुसरा एकत्र चित्रपट असेल. टायगर आणि कृतीने हिरोपंती या चित्रपटातून त्यांच्या बॉलीवूडच्या करिअरची सुरुवात केली आहे.

आपल्या चित्रपटांव्यतिरिक्त टायगर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असतो. तो दिशा पटानीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. मात्र, दोघांपैकी कोणीही याला दुजोरा दिलेला नाही. दिशा अनेकदा टायगरच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते.

विशेषत, टायगरची बहीण कृष्णासोबत तिचे नाते खूप चांगले आहे. टायगर श्रॉफने गुरुवारी देसी मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कूवर पदार्पण करून त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. व्यासपीठाव कूवर आल्यानंतर त्याने एक पोस्ट शेअर केली होती, "नमस्कार मित्रांनो, भारत निर्मित सोशल मीडिया अॅपचा एक भाग असल्याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे, कू आपल्याला भारताच्या अनेक भाषांसोबत जोडते."

त्याने त्याच्या कू अॅपचे खाते चाहत्यांसोबत शेअर केले आहे. त्याचे कू हँडल आहे (@iTIGERSHROFF). यावर तो शर्टलेस हॉट प्रोफाईलमध्ये चमकत आहे. त्याचा हा अवतार चाहत्यांना खूपच आवडला आहे. त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याचे हिरोपंती 2, गणपत आणि रँम्बो हे चित्रपट लवकरच येत आहेत. त्यासाठी त्याने तयारी सुरु केली आहे.

हे ही वाचलत का :

परदेशात कमावण्याची संधी देते हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news