Fist Look Release: Emergency : इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार कंगना राणावत, फर्स्ट लूक रिलीज | पुढारी

Fist Look Release: Emergency : इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार कंगना राणावत, फर्स्ट लूक रिलीज

पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत सध्या आपल्या नवीन येणाऱ्या Emergency या चित्रपटाची जोरदार तयारी करत आहे. या चित्रपटातील इंदिरा गांधींजी भूमिका साकारलेल्या कंगना राणावतचा या चित्रपटातील पहिलाच लूक (Fist Look Release) रिलीज झाला आहे. याची माहिती तिने आपल्या इन्स्टाग्रामवरून तिच्या चाहत्यांना दिली आहे.

या चित्रपटात कंगना ही ‘इंदिरा गांधींच्या लूकमध्ये दिसत आहे. पांढरे केस, चेहऱ्यावर हलक्याशा सुरकुत्या यामध्ये कंगनाचा वेगळा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या पोस्टरसोबत कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आणीबाणीचा फर्स्ट लुक रिलीज (Fist Look Release) करण्यात आला आहे. यामध्ये जगाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि वादग्रस्त महिलांपैकी एक असलेल्या महिलेचे यामध्ये वर्णन करण्यात आले आहे”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

Emergency (इमरजन्सी) या चित्रपटाच्या नावावरूनच हे स्पष्ट होते की, या चित्रपटाची कथा देशातील सर्वात मोठी राजकीय घटना ‘आणीबाणी’ ला अगदी जवळून स्पर्श करणारी आहे. कंगना या चित्रपटात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत असून, आता या चित्रपटाचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. या पहिल्याच लूकमध्ये कंगना इंदिरा गांधींच्या रूपात खूपच आकर्षक दिसत आहे.

कधी होणार रिलीज?

‘इमर्जन्सी’ (Fist Look Release) हा चित्रपट दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना स्वत: करत असून, हा चित्रपट 25 जून 2023 रोजी रिलीज होणार आहे. नुकतेच कंगनाने एक पोस्टर शेअर करून तिच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. कंगनाने यापूर्वी शेवटच्या ‘धाकड’ चित्रपटात दिसली होती.

हेही वाचा:

Back to top button