कॅटरिनाचीही ‘गुड न्यूज’?

कॅटरिनाचीही ‘गुड न्यूज’?
Published on
Updated on

मुंबई : आलिया भट्टने अलीकडेच 'गुड न्यूज' दिली आहे. आता कॅटरिना कैफकडेही 'गुड न्यूज' असल्याची (पुन्हा एकदा) अफवा पसरली आहे. सध्या कॅटरिना लाईमलाईटपासून दूरच आहे. करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत अख्खे बॉलीवूड सहभागी झाले होते; पण जे काही मोजके लोक अनुपस्थित होते त्यामध्ये कॅटरिनाचा समावेश होता.

सध्या ती कोणत्याही पार्टीत किंवा विमानतळावरही दिसत नाही. विशेष म्हणजे सोशल मीडियातही ती सक्रिय नाही. प्रसिद्धीपासून ती अचानक अशी दूर का गेली आहे याचे अनेकांना कोडे पडले. याचा संबंध अनेकजण तिच्या प्रेग्नन्सीशीही जोडत आहेत. ती आणि विकी कौशल आई-बाबा होणार असावेत असा अनेकांचा अंदाज असून ती 16 जुलैला तिच्या वाढदिवशी याबाबतची 'गूड न्यूज' सर्वांना सांगू शकेल असेही अनेकांना वाटते. विकी आणि कॅटरिनाने गेल्यावर्षी 9 डिसेंबरला राजस्थानमध्ये लग्न केले आहे. लवकरच ती सलमान खानसमवेत 'टायगर-3' मध्ये दिसणार आहे.

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने 9 डिसेंबर 2021 रोजी विकी कौशलसोबत लग्न केलं होतं. या जोडप्याचं राजस्थानमध्ये ग्रॅण्ड वेडिंग पार पडलं. यामध्ये कैफ आणि कौशल कुटुंब सामील झालं होतं. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आले आहेत.

कामाच्या आघाडीवर, कतरिना कैफ शेवटची अक्षय कुमारसोबत सूर्यवंशी चित्रपटात दिसली होती. आता तिचा फोन भूत हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यात ती सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टरसोबत दिसणार आहे. हा चित्रपट ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा'मध्ये ती प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news