पाहा: कसं दिसतंय ब्रह्मांड?; जेम्स वेब दुर्बिणीतून घेतलेली ब्रह्मांडाची 'लेटेस्ट' छायाचित्रे नासाकडून प्रथमच प्रसिद्ध | पुढारी

पाहा: कसं दिसतंय ब्रह्मांड?; जेम्स वेब दुर्बिणीतून घेतलेली ब्रह्मांडाची 'लेटेस्ट' छायाचित्रे नासाकडून प्रथमच प्रसिद्ध

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली ‘जेम्स वेब’ या दुर्बिणीच्या सहाय्याने काढलेली ब्रह्मांडाची काही रंगीत छायाचित्रे प्रथमच समोर आली आहेत. आत्तापर्यंत ब्रह्मांडाच्या पाहिलेल्या छायाचित्रांपेक्षा सर्वात स्पष्ट आणि सखोल असलेली ब्रह्मांडाची ही रंगीत छायाचित्रे नासाने नुकतीच प्रसिद्ध केली आहेत.

पाहा: ब्रह्मांडाची हाय-रिझोल्यूशन छायाचित्रे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांच्या उपस्थितीत जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या सहाय्याने घेण्यात आलेले ब्रह्मांडाचे पहिले छायाचित्र प्रसिद्ध केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “वेब स्पेस टेलिस्कोपमधून घेण्यात आलेले पहिले छायाचित्र हे विज्ञान आणि तंत्रज्ञान, खगोलशास्त्र आणि अवकाश संशोधनासाठी संपूर्ण अमेरिकेसह मानवतेसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप लोकांचा विश्वाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा बदलेल, याची ही पहिलीच झलक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Google ने ही हा क्षण केला सेलिब्रेट

विश्वात आपण एकटेच आहोत का? आपण इथे कसे पोहोचलो? असे म्हणत जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपमधून काढलेली ब्रह्मांडाची छायाचित्रे Google ने प्रसिद्ध केली आहेत. संपूर्ण जगासाठी आनंदाचा असलेला हा ऐतिहासिक क्षण गुगलने देखील सेलिब्रेट केला आहे.

पाहा व्हिडिओ: विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य टाइम ट्रॅव्हल मधून उलगडणार? | James Webb Space Telescope | NASA

हेही वाचा:

Back to top button